दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान;सकाळी ९ वाजेपर्यंत 8.10 टक्के झालं मतदान

  • Written By: Published:
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान;सकाळी ९ वाजेपर्यंत 8.10 टक्के झालं मतदान

Voting Today for Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. हे मतदान येथील सर्व ७० विधानसभा जागांसाठी  मतदान पार पडणार आहे. आज बुधवार (दि. ५ फेब्रुवारी)रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (Delhi )कार्यालयाच्या माहितीनुसार १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे आहे. यामधून कोण बाजी मारणार हे येत्या ८ फेब्रुवारी आपल्याला कळणार आहे.

दिल्लीत राजकीय भूकंप! आठ आमदारांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी; केजरीवालांवर खापर

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Feb 2025 10:43 AM (IST)

    दिल्ली विधानसभा निवडणुरकीत आज सकाळी ९ वाजेपर्यंत 8.10 टक्के मतदान झालं.

  • 05 Feb 2025 09:26 AM (IST)

    Delhi Voting : आज दिल्ली विधानसभेसाठी मतादन; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदानाचा हक्क बजावला

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदान केले

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली निवडणूक २०२५ साठी डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात मतदान केले.

    पंतप्रधान मोदींनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट केले, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होणार आहे. मी येथील मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करण्याचे आवाहन करतो. या प्रसंगी, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या विशेष शुभेच्छा. लक्षात ठेवा- आधी मतदान करा, नंतर अल्पोपहार.

     

    अरविंदर सिंग लवली यांनी मतदान केले.

    गांधीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अरविंदर सिंह लवली यांनी मतदान केले.

    मनीष सिसोदिया यांनी मतदान केले

    आप नेते आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आमदार उमेदवार मनीष सिसोदिया यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील लेडी इर्विन वरिष्ठ माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्या पत्नी सीमा सिसोदिया यांनीही येथे मतदान केले.

     

    मुस्कान मतदान केंद्रावर पोहोचली आणि म्हणाली- आधी मतदान करा.

    “मतदान करणे हा आमचा अधिकार आहे,” असे करोल बाग विधानसभा मतदारसंघातील पहाडगंज येथील मतदान केंद्रावरील पहिल्या मतदारांपैकी एक मुस्कान गर्ग म्हणाली. लोक सरकारबद्दल तक्रार करत राहतात, पण जोपर्यंत आपण बाहेर जाऊन मतदान करत नाही तोपर्यंत निष्पक्ष मतदान कसे होईल? प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. आपण हा दिवस सुट्टी म्हणून घेतो, पण आपण आधी मतदान केले पाहिजे आणि नंतर दुसरीकडे कुठेतरी जावे.

     

  • 05 Feb 2025 08:17 AM (IST)

    कडक सुरक्षा व्यवस्था

    निवडणूक आयोगानं दिल्लीतील सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मतदान निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात व्हावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीआरपीएफच्या २२० कंपन्या, १९,००० होमगार्ड जवान आणि ३५,६२६ दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकूण ९७,९५५ कर्मचारी आणि त्याचबरोबर ८,७१५ स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत.

    मतदान केंद्रावर सजावट

    मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता निवडणूक आयोगानं दिल्लीतील मतदान केंद्रावर आकर्षक पद्धतीनं सजावट करण्यात आली आहे. मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आली आहे. मतदानाला प्रोत्साहन मिळण्याकरिता सेल्फी पॉइंट्सवर फोटो काढता यावेत, यासाठी सेल्फी पॉइंट्सदेखील काढण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, शौचालये इत्यादींची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक गुलाबी बूथ, एक मॉडेल बूथ आणि एक दिव्यांग बूथ तयार करण्यात आले आहेत.

    चुरशीची निवडणूक

    माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षानं (आप) सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याकरिता विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले आहेत. उल्लेखीय बाब म्हणजे इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि आपचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.

    संदिप दीक्षित यांनी केल मतदान

    नवी दिल्लीत विधानसभा निवडणुसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रसचे काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी मतदानाचा हक्क बजावला. "मतदार दिल्लीच्या विकासासाठी मतदान करणार आहेत. लोकांनी त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. जंगपुरासाठी सर्वोत्तम वाटतो, अशा उमेदवाराला मतदान केलं आहे. सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं, अशी माझी इच्छा आहे असं ते बोलताना म्हणाले.

     

     

follow us
  • fb
  • instagram
  • youtube