मतदानात बुरख्यावर बंदी नाही, तर परीक्षेत का? नितेश राणेंच्या मागणीला शिंदे सेनेचा विरोध

  • Written By: Published:
मतदानात बुरख्यावर बंदी नाही, तर परीक्षेत का? नितेश राणेंच्या मागणीला शिंदे सेनेचा विरोध

Raju Waghmare On Nitesh Rane : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर आता बुरख्याच्या वादातून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पत्र लिहून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती. तर आता नितेश राणेंच्या या मागणीला शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी विरोध केला असून जेव्हा मतदानादरम्यान बुरख्यावर बंदी नाही तर परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर बुरखा घालण्यात काय अडचण आहे? असं माध्यमांशी बोलताना राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच महायुती सरकार तुष्टीकरणाचे राजकारण सहन करणार नाही हे मंत्री नितेश राणे यांचे अर्धे विधान बरोबर असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

एएनआयशी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, नितेश राणे यांनी जे म्हटले आहे त्यातील अर्धे विधान बरोबर आहे की महायुती सरकार तुष्टीकणाचे राजकारण सहन करणार नाही परंतु जर मतदान केंद्रांवर मतदानासाठी बुरखा घालण्याची परवानगी असेल तर परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर बुरखा घालून परीक्षा देण्यास काय अडचण आहे. असं राजू वाघमारे म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकरांच्या विचारांच्या या भूमीवर असे विधान करावे असे आम्हाला वाटत नाही. असेही यावेळी ते म्हणाले.

तर दुसरीकडे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून दहावी आणि बारावीच्या परिक्षा केंद्रांवर बुरखा घालण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. यामुळे गैरप्रकारांना वाव मिळते म्हणून परीक्षा केंद्रांवर बुरखा घालण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, विद्यार्थिनी हिजाब घालून परीक्षा केंद्रात प्रवेश केला तर परीक्षेत कॉपी होण्याची शक्यता वाढते असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Maha Kumbh 2025 : मोठी बातमी! पंतप्रधान मोदी महाकुंभाला जाणार नाहीत, दौरा रद्द

दुसरीकडे, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत असे विधान सरकारची प्रतिमा मलिन करतात असे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube