Laxman Hake receives threatening call : ओबीसी आंदोलक पत्रकार परिषद पुर्वी लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) धमकीचा फोन आलाय. जरांगे समर्थकाकडून फोनहून धमकी दिल्याचा आरोप केला जातोय. फोनमधील ऑडिओ क्लिप समोर आलीय. समोरून बोलणारी व्यक्ती हाकेंना धमकावत आहे. त्या व्यक्तीने जरांगेंना धमकावत (Manoj Jarange) असल्याचा आरोप हाकेंवर देखील केलाय. हाकेंना शिव्या देखील दिल्या गेल्यात. तुझी लायकी नाही, असं समोरच्या व्यक्तीनं हाकेंना म्हटलंय.
मोबाईल स्वीच ऑफ करून बेपत्ता झाले… धनंजय देशमुख अखेर सापडले
तुला एवढा कशाचा माज आलाय? तुला वाल्मिक कराडने पैसे चारले का? मुंडेनी पैसे चारले का? लईच डॉयलॉगबाजी मारायला लागलाय. तुझ्या मागे कुत्रं नाही, असं देखील फोनवरील व्यक्तीने म्हटलंय. सातारा जिल्ह्यात येवून दाखव, असं या व्यक्तीनं हाकेंना म्हटलंय. त्यामुळे धमकी देणारा व्यक्ती सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळतेय. नाव सांगायला घाबरत नाही, असं त्याने म्हटलंय. आमच्या आरक्षणाने काय फरक पडणार आहे, तुमच्या बापाचं काय जाणार आहे, असा सवाल या फोनवरील व्यक्तीने केलाय.
नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा… सरकारने दंडासह वसुली ; भुजबळांचा लाडक्या बहिणींना इशारा
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे. वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी घेवून देशमुख कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलंय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं आज टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनस्थळी दाखल झालेत. दरम्यान पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आलाय. हा धमकीचा फोन जरांगे यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय.
पत्रकार परिषदेआधी लक्ष्मण हाकेंना हा धमकीचा फोन आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने अरेरावी करत हाकेंना जीवे मारण्याची धमकी दिली. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मी केली. आरोपींचं कधीच समर्थन मी केलं नाही, असं देखील हाकेंनी स्पष्ट केलंय.