Laxman Hake On Maratha Community : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्यापासून ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील अनेक ठिकाणी सभा घेत राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. एका सभेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि ओबीसी लग्नावर वादग्रस्त वक्तव्य केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना ठोकून काढण्याचा इशारा दिला आहे.
तर आता मराठा आंदोलकांच्या या विधानावर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी प्रत्युत्तर देत आमच्या आतापर्यंत 4 पिढ्या घाबरल्या मात्र आता आम्ही बोलणार आणि आंदोलन करणार असं म्हटले आहे. आज बीड (Beed) दौऱ्यावर असताना लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, मी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा एक विचार मांडला होता. मी कुठेही लग्न लावायला गेलो नव्हतो. मी नुसतं बोललो तर एवढ्या इंगळ्या डसल्या असं लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच या लोकांना समाजिक मागसांचं आरक्षण पाहिजे. मागासपणाचे हार्डल्स एकही ऑर्डर्स पुर्ण न करता, आम्ही कसे 96 कुळी, आम्ही कसे क्षेत्रीय आहोत, आम्ही कसे मराठी जात वर्चस्वाची यांची भाषा. आता काय म्हणतायत ठोकून काढू. मी आता खूप घाबरलोय, मी काय आता उद्यापासून सभा काही देणार नाही, घोंगड पांघरुन घरात झोपतो. राजेंद्र कोंढरे यांच्या ठोकून मी एवढा घाबरलो असेही यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले.
आरक्षणासाठी लढायचे नाही का? मंत्री भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल
तर लक्ष्मण हाके यांनी यावेळी हैदराबाद गॅझेट न्यायालयाच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी हाके म्हणाले की, मी तो निकाल पाहिला नाही. तो निकाल पाहून बोलणार. सरकारने काढलेला जीआर रद्द केला नाही तर आम्ही गावागाड्यातील ओबीसी एकत्र येऊ असा इशारा देखील यावेळी लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला.