कॅगचा अहवाल समोर आला असून या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या(Nitin Gadkari) खात्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॅगच्या अहवालातून समोर आलेला भ्रष्टाचार शिष्टाचार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल
कॅगच्या रिपोर्टमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा काटा काढण्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार होतो, हे कॅगने स्पष्ट केलं आहे. एकही टन कोळसा इकडे-तिकडे न नेता काँग्रेसला आरोपींच्या पिंजऱ्यात उभ करण्याचं काम केलं गेलं. यासंदर्भात कॅगने स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसला बदनाम करुन पंतप्रधान झाले, आता हा भष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे काय? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
तलाठी भरतीचाही पेपर फुटला! ऑनलाईन परिक्षेत गैरप्रकार घडल्याचं आलं समोर…
तसेच ‘ना खाऊंगा ना खाने देऊंगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे. नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदींचे चांगले संबंध आहे. गडकरी आणि मोदींच्या संबंधाबाबत देशातल्या जनतेला माहित आहे. गडकरींना राज्यपालपदाची ऑफर दिली पण ते नाही म्हणाले, अशी आमच्यापर्यंत माहिती आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
CM Eknath Shinde : सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले; अजित पवारच इकडं आले; शिंदेंचा टोला
सिनेट निवडणुकीत पराभवाची भीती :
कोणत्याही निवडणुकीला सर्वे करुनच सामोरं जायचं, असं भाजपचं असतं. सिनेट निवडणुकीत भाजपला सर्वेमध्ये पराभव दिसून आल्याने त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. भाजपने याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वे केला होता, तेव्हा ते भुईसपाट होणार होते, त्यांना पराभव दिसल्याने निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.