विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल

विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल

Amit Thackeray letter to the Governor : मुंबई विद्यापीठाने रातोरात एक पत्रक काढून सिनेट निवडणूकांना (Senate election) स्थगित केली. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. ही निवडणुका पुढे ढकलताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही वैध कारण दिले नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? असा थेट सवाल त्यांनी केला.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकी ‘पुढील आदेश’ येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. याचा मनसेच्या युवा सेना आणि विद्यार्थी सेनेला मोठा झटका बसला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतांनाच विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. मनसेनं पत्र लिहून सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही’ यासाठी कुलपतींचे मनःपूर्वक आभार, असे उपरोधिक धन्यवाद मानले

अमित ठाकरे यांचे पत्र –
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत विद्यापीठीने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार, १८ ऑगस्ट) सकाळी विद्यापीठात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र केवळ 12 तासांपूर्वी म्हणजेच काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी कालच्या अधिकृत पत्राचा संदर्भ देऊन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठीच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही.

Ahmednagar Crime : देवही असुरक्षित! जिल्ह्यातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरावर चोरट्यांनी मारला डल्ला 

आपल्याला माहितच आहे की, सिनेट निवडणूक ही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित लोकांसाठी व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या 12 तास आधी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवार आणि मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे 95 हजार पदवीधरांच्या मनात आता वेगळीच शंका निर्माण झाली आहे – मुंबई विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्तादारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट होतं. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिध्द कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनसील प्रकणात जातीने लक्ष घालावं आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने रातोरात स्थगित करण्यात आली हे स्पष्ट करावं, हीच आग्रहाची मागणी.
सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही’ यासाठी कुलपतींचे मनःपूर्वक आभार!

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube