Legislative Council Election : फेरमतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं पाहायाला मिळत आहे. कारण त्यामुळे 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली […]

Untitled Design   2023 02 03T102435.682

Untitled Design 2023 02 03T102435.682

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं पाहायाला मिळत आहे.

कारण त्यामुळे 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत. मात्र, रणजित पाटील यांना या 8 हजार अवैध मतांपैकी 4500 ते 5000 अवैध मते मिळाली. त्यामुळे पाटील यांची ही अवैध मते बाद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांचचं नुकसान झालं आहे.

त्याचबरोबर अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मत अवैध ठरण्याचं कारण म्हणजे एकूण मतदानापैकी 8 हजार 387 मते अवैध ठरली. यामधील सुमारे 6 हजार मतपत्रिकेत मतदारांनी रणजीत पाटील यांच्यासमोर फक्त 2 आकडा लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे पाटील हे बॅलेट पेपरवर दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्या व इतर कुठल्याही क्रमांकाची पसंती मतदारांनी त्या बॅलेट पेपरवर नोंदवली नाही. त्यामुळे सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक मते सरळ निवडणुकीतून अवैध ठरली.

दुसरीकडे जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेला रोष, गेल्या दोन टर्मपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रणजित पाटलांनी न ठेवलेला संपर्क व संवादाचा अभाव, मविआमधील एकजुट, अकोला जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली गटबाजी अशा विविध कारणांमुळे रणजीत पाटील यांना फटका बसला. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी केली. असतानाही ती मतांमध्ये परावर्तीत करण्यात त्यांना अपयश आले.

Exit mobile version