Vidhan Parishad Election 2026 : राज्यात 9 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अनेकांना धक्का देत 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत 28 एप्रिल रोजी देवगिरी या निवसास्थानी राष्ट्रवादी काँग्रसची एक बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या नावावर देखील चर्चा झाली आहे. मात्र विक्रम काकडे यांच्या नावाला पक्षातून मोठा विरोध होत असल्याने या बैठकीत दुसऱ्या नावांवर देखील चर्चा झाली. झिशान सिद्दीकी, सुरेश बिराजदार, उमेश पाटील आणि राजेंद्र जैन यांच्या नावाची चर्चा या बैठकीत झाली असून आज पुन्हा एकदा देवगिरी निवासस्थानी बैठक होणार असून या बैठकीत उमेदवाराचा नाव निश्चित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
आज होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत उमेदवाराच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असं देखील सांगण्यात येत आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुक आज होणाऱ्या या बैठकीत झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील यांच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांचा पराभव झाला होता तर राजेंद्र जैन माजी विधान परिषद आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असल्याने या जागेसाठी त्यांच्या नावाचा देखील विचार करण्यात येत आहे.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे फिक्स? ‘बॉस इज ऑलवेज राईट’ म्हणत नार्वेकरांनी सर्वकाही सांगितलं –
विधान परिषदेच्या 9जागांसाठी राज्यात 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 एप्रिल शेवटाचा दिवस असणार आहे.
