राज्यात पुढील चार दिवस विजा, गारपीट अन् वादळी पावसाचे; हवामान विभागाने दिला इशारा

stormy rain 20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Lightning, hail and stormy rain expected in state for next four days Meteorological Department warns : राज्यामध्ये एकीकडे उन्हाचा तडाखा वाढलेला असताना अचानक ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्ह दिसू लागले आहेत. यामध्येच आता भारतीय हवामान खात्याने पाच दिवसीय अंदाज जाहीर केला आहे. ज्यामध्ये 20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘गोंधळ’च्या दिग्दर्शकाची नवीन कलाकृती!‘आभाळवृक्ष‘ लघुकथेचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यानंतर राज्याच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार?

तर या अगोदरच भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर केला आहे. म्हणजे देशात सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो.

काही राशींना संधीच संधी तर काहींना प्रतिकुल दिवस! कसं आहे आजचं राशीभविष्य जाणून घ्या…

महाराष्ट्रात देखील सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील चिंता वाढणार आहे. कारण भारतीय हवामान विभागानं आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सामान्यपैक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ सगळीकडे सामन्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे. म्हणजे सरासरीच्या 90 ते 95 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे.

Exit mobile version