Download App

BJP Spokesperson : भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर, राम शिंदेंना मिळाली मोठी जबाबदारी

  • Written By: Last Updated:

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांची यांची घोषणा केली आहे. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह मुख्यप्रवक्ते आहेत. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरूप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आ. प्रा. राम शिंदे, आ. राम कदम, आ. अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्णी, श्वेता शालिनी, गणेश खणकर, राजीव पांडे, प्रेरणा होनराव यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

खा. डॉ. अनिल बोंडे, आ. निरंजन डावखरे, आ. प्रवीण प्रभाकर दटके, आ. सिध्दार्थ शिरोळे, आ. श्वेता महाले, गणेश हाके, अवधूत वाघ यांच्यासह 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us