अवकाळी आणि संप अशा दुहेरी संकटात महाराष्ट्र; विधानसभेत विरोधी पक्ष आक्रमक

राज्यात झालेल्या अवकाळी पावसावर आज विधानसभेमध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला. सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले धनंजय मुंडे आक्रमक झाले. त्याआधी शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. त्यावर मंत्री गिरीश महाजन आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी यांनी उत्तर दिले. दरम्यान आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी […]

ajit pawar in vidhan sabha

ajit pawar in vidhan sabha

राज्यात झालेल्या अवकाळी पावसावर आज विधानसभेमध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला. सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले धनंजय मुंडे आक्रमक झाले. त्याआधी शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. त्यावर मंत्री गिरीश महाजन आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी यांनी उत्तर दिले.

दरम्यान आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्ष कांदा  आणि द्राक्ष घेऊन विधानभवनात पोहचले.  विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या देत त्यांनी जोरदार निदर्शने केली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांनी केली.

Chhagan Bhujbal : बाळासाहेब हृदयात तर पवारसाहेब शरीराच्या कणाकणात…

राज्यात गारपीट झालेली असताना दुसरीकडे अधिकारी संपावर आहेत. संपावर आठवडा झाला निर्णय झाला नाही. पाम त्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे होत नाहीत. अशी परिस्थिती अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. त्याचवेळी शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यामुळे तरी कामावर हजर राहावं, असं आवाहन अजित पवार यांनी विधानसभेत केलं.

शेतीवरील संकट आणि संप अशा दुहेरी संकटात महाराष्ट्र सापडला आहे, पण या काळात काही सदस्य चुकीचे विधान करीत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. संप सुरु असल्यामुळे अधिकारी कामावर येत नाहीत, त्यामुळे सरकारने पंचनामा न करताना सरसकट सगळ्यांना मदत करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, हि वस्तुस्थिती आहे. पण सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सर्व जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत आहेत. अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिली. तर राज्यभरात संप सुरु असला तरी पंचनामे होत आहेत, त्यामुळे राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत केली जात आहे, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

 

राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमीनदोस्त, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

Exit mobile version