Chhagan Bhujbal : बाळासाहेब हृदयात तर पवारसाहेब शरीराच्या कणाकणात…
नांदेड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नांदेडमध्ये त्यांच्या अमृतमहोत्सव गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखतीत म्हटले कि बाळासाहेब ठाकरे माझ्या हृदयात आहे तर शरद पवारसाहेब शरीराच्या कणाकणात आणि विचारात आहेत. माझ्यासाठी हे दोन्ही नेते श्रेष्ठ आहेत. मला जर कोणी विचारल की तुम्हाला दोघांपैकी कोण आवडत तर मी सांगेन शरदराव ठाकरे म्हणत त्यांनी मिश्किल उत्तर दिले.
माझ्यामध्ये ही जी कणखरता आहे ती एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी पाहिलेलं आहे. बाळासाहेबांवरती अनेक अडचणी आल्या पण ते नेहमी कणखरपणे न डगमगता उभे राहायचे. निर्भीडपणे बोलायचे नेहमी बिनधास्त राहायचे. आणि दुसरे पवारसाहेब देखील 1995 मध्ये सरकार गेल्यावर करायचं काय असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा पवारसाहेब म्हणतात आता कामाला लागायचं मग पवारसाहेब आणि मी सोबत कामे केली. राज्यातील घराघरात त्याकाळी त्यांनी लॅपटॉप पोहचवण्याचे काम केले. त्यानी देखील अनेक अडचणीवर मात केली. त्यांच्या राजकीय जीवनासोबत, व्यक्तिगत जीवनात देखील अनेक अडचणी आल्या पण ते कधीही मागे हटले नाही. या दोन्ही नेत्याकडे पाहिल्यावर कळते की आपल्या जीवनात काहीच अडचणी नाहीत. के करूशकतात मग आपण का नाही. हे पाहूनच मी अधिक कणखर बनलो.
बाळासाहेबांनाबाबत बोलायचं झालं तर एक निर्भीड वक्ता, कधी कोणाला घाबरणार नाही. एकदा बोलले म्हणजे बोलले त्यांची शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी एकदा सुटलीकी ती वापस येत आहे. कायम आक्रमक आणि पवारसाहेब म्हणजे टोक्यावर बर्फ शांततेत निर्णय घेणार, शांत बसून एखाद्याचा गेम करणारे नेते आहेत.
Maharashtra Politics : राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलेले; विखेंचा हल्लाबोल
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले थांबायचं नाही आपण आपला रस्ता शोधात जायचं आणि आपलं काम करत राहायचं जो थांबतो तो संपतो. माणसाने आपली ओळख लपवली नाही पाहिजे. माझ्याबाबत बोलताना लोक म्हणतात शिवसेनेचे पहिले आमदार, मुंबईचे महापौर, राज्याचे उपमुख्यमंत्री परंतु हे कोणी सांगत नाही की मी जेल यात्री देखील आहे. ही अजून एका पदवी मला चिकटलेली आहे. मला हे सांगताना अजिबात कमी पणा वाटत नाही.
मला जेलमध्ये वर्तमान पात्रांची आणि पुस्तकांची साथ मिळाली मी त्याकाळात अनेक वेगवेळ्या लेखकांची, ऐतिहासिक, भोगोलिक पुस्तक वाचली. मला माझे कुटुंबीय जेलमध्ये वेगवेळी पुस्तक आणून द्यायचे.