Maharashtra Politics : राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलेले; विखेंचा हल्लाबोल
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले असल्याचे विखे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे ते सतत काहीतरी बडबड करत असतात. वाचाळपणा करुन ते आरोप करत असतात. त्यांच्या आरोपात काहीही सत्य नसते. राऊत आता त्यांच्या पक्षात एकटेच शिल्लक राहिलेले आहेत, असा टोला विखेंनी राऊतांना लगावला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षाचे बुडते जहाज आहे. ते आता कधीच सत्तेत देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
बिश्नोईची पुन्हा धमकी; भाईजान सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा
विखे पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते आता कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचे देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकप्रिय योजनांमुळे परिवर्तन होऊ शकेल, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसाच्या परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळपिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब, गहू अशी पिके बाधित आहेत. सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…
या सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. उद्यापर्यंत राज्यातील सर्व पक्षांची आकडेवारी येईल, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटी मध्ये एनडीआरएफ यांच्या निकषा बाहेर जाऊन मदत करणार असल्याचे विखे म्हणाले आहेत.