Lok Sabha Election : देशात यंदा सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन केले जात आहे. जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या महायुतीने निवडणूक प्रचारासाठी समन्वय समन्वय समिती गठीत केली आहे. या समितीत महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभूराज देसाई, उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील यांचा या समन्वय समितीत समावेश आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात तिन्ही पक्षात समन्वय राहावा यासाठी ही समिती काम करणार आहे.
या समितीतील मंत्री तिन्ही पक्षांच्या प्रचारात समन्वय साधणार आहेत. जेणेकरून निवडणूक प्रचारात काही व्यत्यय येऊ नये. या समितीसाठी पक्षांनी नावे दिल्यानंतर त्यापैकी प्रत्येकी दोन मंत्र्यांची निवड करण्यात आली. यानंतर समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. काही मतदारसंघात तिढा कायम असला तरी महायुतीने आतापर्यंत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. या उमेदवारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी प्रचारही सुरू केला आहे. आता या प्रचारात आणखी व्यवस्थितपणा यावा यासाठी ही मंत्र्यांची समिती काम करणार आहे.
महायुतीत ‘या’ मतदारसंघांत तिढा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग-रत्नागिरी, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर आणि सातारा मतदारसंघात भाजप उमेदवार देईल. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवार घोषित करू शकते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. लक्षद्वीपमधील एक जागाही त्यांना मिळणार आहे. बारामती, शिरुर, रायगड, धाराशिव, परभणी आणि लक्षद्वीप या जागा अजित पवार गटाला दिल्याची माहिती आहे.
Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर