Malfunction in EVM : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकही मतदानासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, मतदान सुरू होताच अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
तुम्हाला सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय…; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना चिमटा
राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे 6 आणि गंगापूर येथे 2 ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या प्रशासनाकडून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सूर आहे. छत्रपती संभाजीनगरमधीलच सातारा परिसरातील चाटा स्कूलमध्येही ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत .त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
याशिवाय, दुसरीकडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालय मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनही काही काळ बंद पडलं होतं. पुण्यातील वडगाव शेरी येथेही ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली. त्यामुळे अर्धा तास मतदान बंद राहिले. परिणामी मतदानासाठी नागरिक खोळंबळे होते.
दरम्यान, निवडणूक कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएम दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम देखील बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या तीन टप्प्यातील मतदानादरम्यानही राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळं मतदारांनी संताप व्यक्त केला होता.
शिरूरमध्ये 32 उमेदवार रिंगणात
शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे. शिरूरमध्ये ३२ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत.