धक्कादायक! ईव्हीएम हॅकींगसाठी दानवेंना अडीच कोटी मागितले; पुण्यातून एक जण ताब्यात

धक्कादायक! ईव्हीएम हॅकींगसाठी दानवेंना अडीच कोटी मागितले; पुण्यातून एक जण ताब्यात

Ambadas Danve demand money for EVM Hacking one arrested : देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली तर याच दरम्यान दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम हॅक ( EVM Hacking ) करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांच्याकडे अज्ञातांकडून तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी एकाला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात ( arrested ) घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे दानवे यांच्याकडे ईव्हीएम हॅक करण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे दानवे यांच्या भावाने सापळा रचला. संबंधित आरोपीला पैसे देण्यासाठी बोलावण्यात आलं. त्याचवेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मारुती ढाकणे या आरोपीला पुण्यातून एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? पंकजा मुंडेंचा थेट सवाल

आरोपी हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने दानवे यांना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे ईव्हीएम आहेत. ते सर्व हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो. असं अश्वासन देत अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. हा सर्व प्रकार लक्षात येतात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

रूपाली चाकणकर यांना ईव्हीएमची पूजा भोवली…

आज ( 7 मे ) ला देशासह राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये राज्यातील तब्बल 11 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रत्येक मतदारसंघात तेथील उमेदवारांसह दिग्गज नेत्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी धायरी येथील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्या होत्या.

अजित पवार हे पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निकाल बारामतीकर घेणार

यावेळी मतदान करण्याअगोदर चाकणकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली. मात्र अशा प्रकारे पूजा करणं त्यांना चांगलचं भोवलं आहे. कारण या प्रकरणी त्यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वातावरणात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये असलेल्या चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube