Pune News : धक्कादायक! तहसील कार्यालयातूनच ‘ईव्हीम’ कंट्रोल युनिट चोरले; गुन्हा दाखल

Pune News : धक्कादायक! तहसील कार्यालयातूनच ‘ईव्हीम’ कंट्रोल युनिट चोरले; गुन्हा दाखल

Pune News : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Elections 2024) या निवडणुकांच्या तयारीत प्रशासन गुंतले आहे. अशातच पुरंदर तालुक्यातील (Pune News) सासवड येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांनंतर सोमवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड येथील तहसील कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरुन नेले. ही घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विविध ठिकाणी पथके तैनात केली आहेत. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील 40 ईव्हीएम मशीनपैकी फक्त एक डेमो युनिट चोरट्यांनी चोरून नेले. बाकीचे मशीन सुरक्षित आहेत. आमची टीम या प्रकरणी तपास करत आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान.. आव्हाडांना शंका

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँगरुमचे कुलूप कुणीतरी तोडल्याचे लक्षात आले. याठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एका ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरून नेल्याचे निदर्शनास आले. आता सरकारचे तहसील कार्यालय सुद्धा सुरक्षित राहिले नसल्याचे या चोरीवरून स्पष्ट होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube