10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? पंकजा मुंडेंचा थेट सवाल
Pankaja Munde News : निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा थेट सवाल पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भर सभेतच केला आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Loksabha) महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेसाठी बीड जिल्ह्यासह महायुतीचे इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टीकेवरुन सवाल केलायं.
देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप
पंकजा मुंडे म्हणाल्या, देशात निवडणूक आली की विरोधकांकडून जातीपातीसह धर्माचा मुद्दा बाहेर काढला जातो. मागील 10 वर्षांपासून देशात मोदींचं सरकार आहे, पण गेल्या 10 वर्षांत मुस्लिम बांधवांच्या केसाला तरी धक्का लागलायं का? मुस्लिम बांधवांना कोणी थोडा तरी त्रास दिलायं का? लोकांना घाबरवण्यासाठी विरोधकांकडून कायद्यांची भीती दाखवली जाते पण तुमचे पूर्वज जिथे कुठे जन्मले असतील तरीही हा देश तुमचाही आहे तुमचे केसही कोणी वाकडं करु शकत नाही, असं तुम्हाला वचन देत असल्याचंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.
विकासाचा मुद्दा नसताना विरोधक मतदारांना कुठेतरी भरकटवायचं काम करीत आहेत त्याला बळी पडू नका, देशात 2014 पर्यंत शौचालय, पाणी, लाईट नव्हती या सर्व गोष्टी पोहोचवण्याचं काम मोदींनी केलंय. गोपीनाथ मुंडेंनी मला पाच वर्ष मागितले पण त्याआधीच ते निघून गेले . आता जनताच माझ्यासाठी गोपीनाथ मुंडे आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजेंपासून ते ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रेम दिलं आहे . त्यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्वांना वाटतं ते माझे आहेत. आता त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. तुमची, गोपीनाथ मुंडेंची, मोदींची मान खाली जाईन असं मी कधी करणार नाही, वंचितांच्या लढाईत अंगावर वार झेलणार असल्याचा शब्दच पंकजा मुंडे यांनी यावेळी जनतेला दिलायं. दरम्यान, आजपासून पाच वर्ष सालगडी म्हणून ठेवा विकासापासून जिल्ह्याला वंचित ठेवणार नाही, असं वचनही मुंडेना बीडवासियांना दिलं असून आता थकायचं नाही थांबायचं नाही अन् कोणालसमोर झुकायचं नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंज सोनवणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ताकद लावण्यात येत आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडेही मागे राहिलेल्या नाहीत. त्यामुळे आता या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार? हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.