Download App

जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’ची आज मेगा बैठक; मनसेही करणार प्लॅनिंग

Lok Sabha Election Maharashtra : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजून निश्चित नाही. नेत्यांच्या बैठका सुरू (Maharashtra Politics) आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मनसेचीही आज महत्वाची बैठक होत असून या बैठकीत महायुतीत जायचे की नाही या महत्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, काल काँग्रेसने राज्यातील काही उमेदवारांची फायनल केली असल्याची माहिती आहे.

Lok Sabha Election : महाराष्ट्राची वाट खडतर! फाटाफुटीने अवघड केला निवडणुकीचा पेपर

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र यानंतरही महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. राज्यातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. मात्र जागावाटपात एकमत होत नसल्याने कुणाला किती जागा द्यायच्या यावर अजून तरी निर्णय झालेला नाही. आता यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप निश्चित होईल असे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असून सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर पुण्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

यामध्ये चंद्रपूरमधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ.बळवंत वानखेडे (अमरावती), आ.विकास ठाकरे (नागपूर), आ. प्रणिती शिंदे (सोलापूर), आ.रवींद्र धंगेकर (पुणे), गोवाशा पाडवी (नंदूरबार), प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले (गोंदिया-भंडारा), नामदेव किरसान (गडचिरोली), अभय पाटील (अकोला), वसंतराव चव्हाण (नांदेड), डॉ. कलगे (लातूर) यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात आहे.

 “लोकसभा माझ्या नशिबात, डावललं असतं तर इथपर्यंत आले नसते” खैरेंचा दानवेंना टोला

दरम्यान, राज ठाकरे महायुतीत येणार का हे अद्याप ठरलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

follow us