Download App

सरकारी उधळपट्टी रडारवर! प्रचारासाठी दररोज 2.80 कोटींचा चुराडा; काँग्रेस नेत्याने आदेशच दाखवला

Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रात (Lok Sabha Election) या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. प्रचारावर कोट्यावधींचा खर्च केला आहे. सत्ताधारी मंडळींनी यात आघाडी घेत जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. सरकारची हीच प्रचाराची मोहिम विरोधकांच्या रडारवर आली आहे. काँग्रेसने शिंदे सरकावर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी एक सरकारी आदेश सोशल मीडियावर शेअर करत सरकारला धारेवर धरले आहे.

Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

एकीककडे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण, सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

याबाबत सतेज पाटील यांनी एक्स अकाउंटवर सरकारचा आदेश शेअर केला आहे. महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी विशेष माध्यम आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी तब्बल 84 कोटी रुपये म्हणजेच दिवसाला 2 कोटी 80 लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत. या खर्चाची आकडेवारीत वर्तमानपत्र 20 कोटी रुपये, न्यूज चॅनेल 20 कोटी 80 लाख रुपये, डिजिटल होर्डिंग, एलईडी 37 कोटी 55 लाख रुपये आणि सोशल मीडियावरील जाहिरातबाजीसाठी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

ऐन आचारसंहिता काळात जनतेच्या पैशांच वापर हा पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. ही गोष्ट मुक्त अन् निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक असून निवडणूक आयोगाने याला आळा घालावा आणि ही प्रसिद्धी मोहिम तत्काळ थांबवावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. एकीककडे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण, सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

follow us