Assembly Session : विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता भाजपच्या एका आमदाराने लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन लक्ष वेधलं आहे. अहमदनगरच्या राहुरीत घडलेल्या प्रकराविषयी माहिती देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) कार्यकाळातच लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन आमदार लाड यांनी उद्धव ठाकरेंवरच खापर फोडल्याचं दिसून आलं आहे.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2023 l Point of Information
राहुरी तालुक्यातील (जि. नगर) उंबरे गावातील अल्पवयीन मुलीचे शोषण तसेच नगरमधील या हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि हिंदू मुलांना झालेली अमानुष मारहाण प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.… pic.twitter.com/RVEQ8V140M
— Prasad Lad (@PrasadLadInd) July 28, 2023
सभागृहात लाड म्हणाले :
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील उंबरगावमध्ये 26 जुलैला एक घटना घडली. यामध्ये अल्पवयीन मुलींना कोचिंग क्लासच्या माध्यमातून इरफान पठाण नामक माणूस आणि इतर शिक्षिक जबरदस्ती कुराण वाचायला लावत असे. तसेच मुस्लिम समाजाचे सणही साजरे करायला सांगत असे. याचदरम्यान मुस्लिम समाजाच्या इतर मुलांना बोलवून घेत ते मुलींचे फोटो कढून मॉर्फ करुन लव्ह जिहादच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचं सुरु होतं.
भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना ED लावणार; 40 पैकी 33 प्रकरणात आरोपपत्र दाखल!
या प्रकरणी एका मुलीने हिम्मत करुन घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला . त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पालकांनी पोलिस ठाणं गाठलं पण पोलिसांनीच या गावकऱ्यांना मारहाण केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी आमदार लाड यांनी केली आहे.
दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत संपूर्ण कथन केल्यानंतर या प्रकरणी उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर लव्ह जिहाद प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी कायदाही आणला जाणार असल्याचं आमदार लाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे.