भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना ED लावणार; 40 पैकी 33 प्रकरणात आरोपपत्र दाखल!
Devendra Fadanvis : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना ED लावणार असल्याचं सांगितलं. तर शिक्षण विभागात गैरप्रकार केलेल्या 40 पैकी 33 प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Devendra Fadanvis says ED action on corrupts education officers )
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शिक्षण विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचं पत्र आयुक्तांनी एसीबीला लिहिलं आहे. या पत्रानुसार 2007 आणि 2011 पासूनच्या वेगवेगळ्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच या विभागात निलंबित अधिकाऱ्याचा निलंबनाचा काळ संपल्यावर त्याला त्याच पोस्टवर घ्याव लागत ही समस्या आहे. कारण वेतनवाढ थांबवल्याने देखील हे प्रकरण थांबत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर फौजदारी कारवाईची गरज आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या पत्रानंतर शिक्षण विभागात गैरप्रकार केलेल्या 40 पैकी 33 प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहेत. 3 प्रकरण सॅक्शनसाठी आहेत. त्यावरही कारवाई होईल. असी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘कर्जत येथील नीरव मोदीची जमीन ही…’; रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
तसेच ते पुढे म्हणाले, यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. मात्र यावर आणखी चाप बसण्यासाठी या संबंधित अधिकाऱ्यांची मालमत्ता देखील जप्त केली जाईल. कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. गरज पडली तर ही प्रकरणे ED कडे पाठविली जातील. त्यात नाशिक शिक्षणविभागात घडलेलं प्रकरण हे अगोदर ईडीकडे पाठवली जाईल. असं देखील फढणवीस म्हणाले. त्याचबरोबर अनुदानित शाळांमधील भरती केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले.
राज्यात दरवर्षी 1 लाख कोटी रुपये आपण शिक्षणावर खर्च करतो. तेवढं बजेड कोणत्याही राज्याचं नाही. पण त्यातून जो सामाजिक परतावा मिळायला हवा, तो मिळत नाही. असं देखील यावेळी फडणवीसांनी सांगितलं.