कमी दाबाच्या पट्ट्याने एल निनोवर केली मात, कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत पुरेसा पाऊस

El Nino सक्रीय झाल्याने देशातच कमी पावसाचा अंदाज होता मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला.

El Nino

El Nino

Low-pressure belt overcomes El Nino adequate rainfall in Krishna and Godavari basins : यावर्षी एल निनो सक्रीय झाल्याने संपूर्ण देशातच कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळेच मान्सूनही उशिरा आला. मात्र, अलीकडेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्रातील कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत अल्पाधितच चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जून आणि जुलैची सरासरीही भरून काढली गेली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी पाऊस आणि धरणांतील पाण्यासाठ्यासंबंधी माहिती दिली.

जमीन बळकावण्यावर नवा कायदा; विद्यमान व्यवस्था अपुरी का ठरली?, सरकारने आकडेवारी जाहीर करावी

मंत्री विखे पाटील यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीचा, तसेच धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा विभागातील अधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीस पुणे आणि नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दोन्ही महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

Video : जे कायद्यातच नाही ते शिक्षकांच्या वाट्याला; TET’चं बंधन हा अन्याय, दत्तात्रय सावंत आंदोलनाच्या तयारीत

कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत झाल्यामुळे या दोन्ही विभागांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. दोन्ही विभागांतील धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली असल्याचे दोन्ही महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ टक्के होता, तो ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या ५ दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, वीर धरण समूहातील भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी, नीरा देवघर धरणामध्ये २.६२ टीएमसी अशा पद्धतीने धरणांमध्ये पाण्याची आवक झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईला खंडपीठाचा दणका! वर्ध्यातील गोरस भांडारचा परवाना त्वरित बहाल करण्याचे निर्देश

नाशिक विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये भंडारदरा ४.७५ टीएमसी, निळवंडे १.७१ टीएमसी, दारणा १.५५ टीएमसी आणि गंगापूर २.१२ टीएमसी अशा पद्धतीने पाण्याची आवक झाली असून, छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा सुमारे २१.७६ टीएमसीपर्यंत पोहोचला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बाईक-टॅक्‍सी चालकांना राज्य सरकारला रोज द्यावा लागणार 5 रूपये कर : सरनाईक

या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील अतिवृष्टीची सद्यस्थिती, पूरस्थिती, धरणांमधील जलसाठा व प्रमुख नदीखोऱ्यांतील पाण्याची आवक, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार धरण संचलन आणि आषाढी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी धरणांचे सुरक्षित, वैज्ञानिक व समन्वयपूर्ण संचलन करावे. भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग व हवामान पूर्वानुमान प्रणालीकडून प्राप्त होणाऱ्या अंदाजांचा सातत्याने आढावा घ्यावा. धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक, जलसाठा, विसर्ग आणि नदीपात्रातील प्रवाह या संभाव्य परिस्थितीचे सातत्याने विश्लेषण करून त्यानुसार वेळेवर निर्णय घ्यावा. धरणांमधून विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राज्य व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Exit mobile version