LPG Gas Cylinder Price : दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईत मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये मध्यमवर्गीयांना एलपीजी गॅस परवडणारा व्हावा यासाठी 30,000 कोटी रुपयांचे अनुदान (LPG Gas Cylinder Price) मंजूर करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी माहिती दिली.
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत गॅसची किंमतीमध्ये चढ- उतार होत असल्याने अनुदार देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तर 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 12000 कोटी रुपयांचे अनुदान मंत्रिमंडळाने मंजूर केले. तांत्रिक शिक्षण संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 4,200 कोटी रुपयांना मंजुरी दिली असल्याची माहिती देखील अश्विनी वैष्णव यांनी दिली.
#WATCH | Delhi: After the cabinet meeting, Union Minister Ashwini Vaishnaw says, “To ensure that the LPG gas is affordable for the middle class, a subsidy of Rs 30,000 cr has been approved…In present geopolitics, gas prices fluctuate and to take care of that, the subsidy is… pic.twitter.com/Y5bYgXB8zC
— ANI (@ANI) August 8, 2025
अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, मंत्रिमंडळाने 4200 कोटी रुपयांच्या खर्चासह बहुविद्याशाखीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणातील संशोधन सुधारणा (MERITE) योजनेसाठी अर्थसंकल्पीय सहाय्य मंजूर केले. राज्य सरकारी संस्थांना MERITE अंतर्गत पाठिंबा दिला जाईल. भारतातील 175 अभियांत्रिकी संस्था आणि 100 पॉलिटेक्निकना याअंतर्गत लाभ मिळतील.
मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन …