Luxurious sea facing view flat worth Rs 16 crores, unused But Dhananjay Munde don’t leave the government residence : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्या चार महिन्यांपुर्वीच गेले आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा त्यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना हे पद गमवावं लागलं. मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील धनंजय मुंडे यांनी त्यांना मंत्री असताना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यासाठी त्यांना दंड देखील आकारण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांचा मुंबईमध्येच सी फेसिंग व्ह्यू असलेला अलिशान फ्लॅट आहे. तरी देखील ते सातपुडा हा शासकीय बंगला सोडत नाही आहेत.
सावधान! राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा धुमाकूळ; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान त्यांनी हा बंगला सोडला नसल्याने नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांना हा बंगला मिळणार आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी हा बंगला अद्यापही सोडलेला नसल्याने भुजबळ हे प्रतिक्षेत आहेत. मुंडे यांनी 4 मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर त्यानी 15 दिवसांत बंगला सोडने अपेक्षित होते. तसेच त्यानंतर मंत्री झालेल्या भुजबळांना तो बंगला मिळणार आहे. मात्र मुंडेंनी बंगला न सोडल्याने त्यांना तो मिळत नाही.
तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक अन् जितेंद्र आव्हाड समर्थकांत धक्काबुक्की; भाजप कार्यकर्तेही आक्रमक
दरम्यान मंत्र्यांनी अशाप्रकारे मंत्रिपद गेल्यानंतर देखील शासकीय निवासस्थान न सोडल्यास त्यांना दंड देखील आकारण्यात येतो. त्यामुळे आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्या चार महिन्यांपुर्वीच गेले आहे. मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील धनंजय मुंडे यांनी त्यांना मंत्री असताना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे त्यांना देखील दंड आकारण्यात आला आहे. हा दंड तब्बल 42 लाखांवर गेला आहे. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे घर नसल्याने आपण हे शासकीय निवासस्थान सोडत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आता त्यांच्याकडे अलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
कसा आहे मुंडेंचा सी फेसिंग व्ह्यूचा अलिशान फ्लॅट?
मुंडेंच्या शासकीय निवासस्थान सोडत नसल्याच्या चर्चांदरम्यान त्यांच्या विधानसभेच्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे की, मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे त्यांचे घर आहे. मात्र ते वापरात नाही. एन. एस पाटकर मार्ग येथील वीरभवन इमारतीमध्ये 9 व्या मजल्यावर 902 क्रमांकाचं सी फेसिंग व्ह्यूचा अलिशानघर आहे. 2 हजार 151 चौरस फुटाचं हे घर आहे. या अलिशान घराची किंमत तब्बल 16 कोटी 50 लाख आहे. हे घर त्यांच्या पत्नी राजश्री आणि धनंजय मुंडे यांच्या संयुक्त नावावर आहे. त्यात त्यांनी आपण 10 कोटी दिल्याचं मुंडेंनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
भाविकांवर काळाचा घाला! पिकअप अन् ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी
दुसरीकडे मुंडे यांना अलिशान घर असताना ते शासकीय निवासस्थान सोडत नाही आहेत. तसेच त्यासाठी त्यांना दंड करण्यात आला आहे. ही दंडाची रक्कमही ते भरत नाही आहेत. तसेच त्यावेळी त्यांनी आपल्याकडे घर नसल्याने आपण हे शासकीय निवासस्थान सोडत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आता त्यांच्याकडे अलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.