Download App

मधुकरराव चव्हाण यांना मोठा धक्का! हजारो कार्यकर्ते राणाजगजितसिंह पाटलांच्या उपस्थितीत भाजमध्ये

सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्‍याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब

  • Written By: Last Updated:

Ranajagjitsinh Patil : तुळजापूर येथे मधुकरराव चव्हाण यांच्या हजारो समर्थकांचा भाजपत प्रवेश झाला आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील मधुकरराव चव्हाण यांच्या हजारो कट्टर समर्थकांचा आज महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेशाचा प्रवेश झाला.

सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्‍याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतला. महायुती सरकारने त्यासाठी आता ११ हजार ७०० कोटी रूपयांची मान्यता दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. डॉ. साहेबांनी सुरू केलेले हे काम आपण मोठ्या जबाबदारीने पूर्णत्वाकडे आणलं असल्याचं यावेळी राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.

तालुक्याचा अन् नळदुर्गचा कायापालट करायचा आहे, सर्वांनी सहकार्य करावं ; राणाजगजितसिंह पाटील यांचं आवाहन

शेतकर्‍यांना कर्जमाफी, वीजबिल माफी महायुती सरकारनेच दिली. मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले, लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रूपये लाभाची योजना सुरू केली. त्यामुळे विरोधकांना अडीच वर्षात महायुती सरकारने काय केले, हे विचारण्याचा नैतीक अधिकार राहिला नाही. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत आपल्याला काय मिळाले? याचा सर्वांनी विचार करावा? महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात धाराशिव जिल्हा आणि आपल्या मतदारसंघात काय केले? याचा कार्य अहवाल आपल्या सर्वांसमोर मांडला आहे असंही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्यासाठी राज्य सरकार कडून आणखीन निधी खेचून आणण्यासाठी आपल्या आशीर्वाद व पाठिंबाची गरज आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला भरभरून मतदान करून गावातून मोठे मताधिक्य मिळवून द्यावे, अशी विनंती केली. यावेळी सांगवी अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी पाडोळीसह जवळपासच्या गावातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

follow us