पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय पवारांच्या कोर्टात; अनिल देशमुखांचा मोठा राजकीय बॉम्ब

पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय पवारांच्या कोर्टात; अनिल देशमुखांचा मोठा राजकीय बॉम्ब

Anil Deshmukh says Sharad Pawar will decide whether Pankaja Munde should join NCP or not : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पक्षातील काही नेत्यांमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या बातम्या येत आहेत. पक्षातील कलहामुळे त्या नाराज असून भापजातून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरू होती. अशातच काल त्यांनी मी भाजपमध्ये आहे. पण, भाजपत थोडीच माझा आहे, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. पंकजा यांच्या या वक्तव्याने त्या पुन्हा एकदा पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली.

अनिल देशमुख म्हणाले की, पंकजा मुंडे काय म्हणाल्या ही त्यांच्या पक्षाची वैयक्तिक बाब आहे, त्यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यावर भाष्य करणं मला गरजेचं वाटत नाही. मात्र, पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागत करू, असं देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

देशमुख म्हणाले, पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश द्यायचा की नाही, याबबत त्यांच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी, जिल्ह्यातील अन्य स्थानिक नेत्यांशी चर्चा करून, त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावरच करून निर्णय घेतला जाईल. पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत घ्यायचं की, नाही याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतली. मात्र, पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे, असं माझ्या कानावर आलं नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
एका कार्यक्रमात बोलतांना त्या म्हणाल्या की, मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझी आहे. मी घाबरत नाही. मी कशालाही घाबरत नाही. निर्भयता आमच्या रक्तातच आहे. मला कशाचीही चिंता नाही, काळजी नाही. काहीच नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईन. आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. आपल्याला जीवनात कोणत्याही गोष्टीची लालसा, इच्छा नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जातील का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube