Download App

ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून लोकभावनांना मान

cabinet meeting लोकभावना, न्यायालयीन निर्णय आणि परंपरांचा सन्मान राखत सरकारने भूमिका घेतली आहे की, "ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल!"

Madhuri elephant to Kabutarkhana; CM respects public sentiments in cabinet meeting : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धार्मिक परंपरा आणि भूतदयेच्या मूल्यांची जपणूक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीण ‘माधुरी’च्या परतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर, आता कबुतरखाना वाचविण्यासाठीही सरकार मैदानात उतरले आहे. लोकभावना, न्यायालयीन निर्णय आणि परंपरांचा सन्मान राखत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, “ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल!”

मोठी बातमी! UAN बाबतीत EPFO ने घेतला मोठा निर्णय; पहिल्या जॉबसोबत ‘या’ कामाकडे दुर्लक्ष नको

कबुतरखाना बंद? मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कबुतरखान्याच्या अचानक बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट बैठक घेत महत्त्वाचे निर्देश दिले. “कबुतरखाना तात्काळ बंद करणे योग्य नाही,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, फीडिंगसाठी वेळेचे नियम ठरवून ते नियंत्रित करता येतील. तसेच, “कबुतराच्या विष्ठेच्या साफसफाईसाठी विशेष तंत्रज्ञान वापरता येईल,” असे सांगून स्वच्छतेवर भर दिला.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मनेका गांधी यांच्याशी देखील चर्चा केल्याचे सांगितले. त्यांनी हायकोर्टात राज्य सरकार व महापालिकेने ठाम भूमिका घ्यावी असे स्पष्ट केलं. गरज भासल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही दिला.

ब्रेकिंग! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

पर्यायी जागेपूर्वी बंदी नाही! – मंत्रिमंडळाचा निर्णय स्पष्ट

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मंत्री लोढा यांनी स्पष्ट सांगितले की, “पर्यायी व्यवस्था न झाल्यास तोवर कबुतरखाना बंद केला जाणार नाही.” तसेच, महापालिकेला रिस्ट्रिक्टेड फीडिंगची जबाबदारी देण्यात आली असून पाणीपुरवठाही पुन्हा सुरू केला जाईल.

संयुक्त राष्ट्रसंघाला किती पैसा देतो भारत? जाणून घ्या, टॉप 10 मध्ये किती देश..

जैन समाज संतुष्ट – सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास

ललित गांधी (अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ) यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “जीवदया आमच्या परंपरेचा भाग आहे. सरकारने आमच्या भावना समजून घेतल्या, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.” मंत्री लोढा यांनी हिंदू आणि जैन समाजाच्या भावना समजून घेतल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आटोपला, आता कधी अन् कुणाशी होणार मॅच? जाणून घ्या, शेड्यूल..

माधुरी हत्तीणसाठी सरकार सुप्रीम कोर्टात

हत्तीण माधुरी गेल्या ३५ वर्षांपासून नांदणी मठात आहे. ती ज्या नव्या वातावरणात हलवण्यात आली आहे, तिथे तिचं रुळणं शक्य होईल की नाही, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंका व्यक्त केली. “धार्मिक परंपरेचा आदर राखत माधुरीला परत आणणे आवश्यक आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार आणि मठ दोघेही सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार असून, हत्तीणच्या निगेसाठी डॉक्टरसह विशेष टीम तयार करण्यात येणार आहे. रेस्क्यू सेंटर, आहार, आरोग्य यासाठी सर्व काही सरकारच्या याचिकेत नमूद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्तीणी पाठोपाठ कबुतरांनाही अभय

सरकारचा दोन्ही मुद्द्यांवर ठाम आणि भावनिक पाठिंबा

धार्मिक भावना, जीवदया आणि परंपरेचा सन्मान राखत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही विषयांवर संवेदनशीलता दाखवली आहे. एकीकडे लाखो भाविकांची श्रद्धा असलेली माधुरी हत्तीण, तर दुसरीकडे जैन समाजाच्या परंपरेचा भाग असलेला कबुतरखाना — या दोन्ही बाबतीत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत जनतेचा विश्वास जिंकला आहे.

follow us