ब्रेकिंग! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

ब्रेकिंग! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

Former Governor Satyapal Malik passes away : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे (Satyapal Malik) निधन झाले असून, त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक तडफदार आणि परखड नेता हरपला (Former Governor Satyapal Malik) आहे. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पक्षांमध्ये (BJP) कारकीर्द केली, विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आणि अखेरच्या टप्प्यात केंद्र सरकारवर (Politics News) जोरदार टीका करत चर्चेत राहिले.

सुरुवातीचे जीवन

24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसावडा गावात जन्मलेल्या सत्यपाल मलिक यांचे वडिलांचे निधन त्यांच्या दोन वर्षांच्या वयातच झाले. लहानपणापासून संघर्ष आणि अभाव अनुभवलेले मलिक शिक्षणादरम्यानच राजकारणाकडे वळले. त्यांचं राजकीय मार्गदर्शन थेट चौधरी चरण सिंह यांनी केलं. त्यांना भारतीय क्रांती दलामार्फत 1976 साली बागपत विधानसभेत पाठवण्यात आलं.

संयुक्त राष्ट्रसंघाला किती पैसा देतो भारत? जाणून घ्या, टॉप 10 मध्ये किती देश..

राजकारणात प्रवेश

सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकीर्द ही पक्षांतरांनी भरलेली होती. 1980 मध्ये ते लोकदलाच्या तिकिटावर राज्यसभेत गेले. आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेत तुरुंगवासही पत्करला. मात्र, 1984 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे काँग्रेस सोडून त्यांनी स्वतःचा जनमोर्चा पक्ष स्थापन केला. 1988 मध्ये हा पक्ष जनता दलात विलीन केला. 1989 मध्ये ते अलिगडमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षातही प्रवेश केला. 1996 मध्ये निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाले.

भाजपमध्ये प्रवेश आणि राज्यपालपद

2004 मध्ये सत्यपाल मलिक भाजपमध्ये दाखल झाले. 2012 मध्ये त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्यपालपद भूषवले :

2017 : बिहार
2018: जम्मू आणि काश्मीर
2019: गोवा
2020 : मेघालय

कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्तीणी पाठोपाठ कबुतरांनाही अभय

पुलवामा हल्ला अन् भाजपशी मतभेद

सत्यपाल मलिक यांचे मोदी सरकारशी संबंध शेतकरी आंदोलनानंतर पूर्णपणे बिघडले. मेघालयचे राज्यपाल असताना त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले होते की, “दिल्लीत जर एखादा कुत्रा मेल असता, तरी दुखवटा जाहीर झाला असता, पण 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केलं गेलं.
पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप ठेवत म्हटले होते की, हा हल्ला सरकारच्या निष्काळजीपणामुळे घडला.

राजकीयदृष्ट्या सक्रिय असूनही मलिक यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रकृती खालावल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. निधनापूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच दिवशी त्यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते, हेही विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या जाण्याने एक स्पष्टवक्ते आणि वादग्रस्त पण सजग राजकारणी हरपला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube