मंत्रिमंडळात प्रवेश न दिल्याने नाराज भुजबळांना तुर्तास भाजपनं प्रवेशाची द्वारं बंद केली आहेत. त्यामुळे आता भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपनं छगन भुजबळांसाठीची (Chhagan Bhujbal) द्वारं बंद केल्यानंतर रासपचे महादेव जानकर (Mahadeo Jankar) मदतीला धावले असून, त्यांनी भुजबळांना खुश्कीचा मार्ग सूचवला आहे. जानकरांनी सुचवेल्या मार्गावर भुजबळांनी जानकर यांनी सूचना केली आहे, ठीक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Mahadeo Jankar On Chhagan Bhujbal)
तुम्ही मंत्रिमंडळात ‘इन’ होणार का? भुजबळांचे मोठं विधान, म्हणाले, ‘फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द…’
जानकरांचा भन्नाट मार्ग काय?
टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी बोलताना जानकर म्हणाले की, भुजबळांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा असा सल्ला जानकरांनी दिला आहे. तसेच त्यांनी पक्ष काढावा आम्ही त्यांच्यासोबत युती करू. लोकसभेला तिसऱ्या पक्षाची मतं भाजपला वळवल्याचेही यावेळी जानकरांनी सांगितले.
ओबीसींची अशीच अवस्था होणार
भुजबळांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे का? असा प्रश्न जानकरांना विचारण्यात आाला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ओबीसींची ही अशीच अवस्था होणार असे म्हणत जिस समाज का दल है उस समाज का बल है. त्यांच्यावर अन्याय झाला असे मी आता म्हणून शकणार नाही. कारण, आपला पक्ष तयार पाहिजे होता पण तसं नाहीये.
“पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा
आपण याचिकाकर्ता आहे असे म्हणत देणारे बनणारे असाल तर आम्ही आमचं दल तयार केलं पाहिजे. यासाठी आम्ही त्यांनी समता परिषदेचा एखाद पक्ष तयार करा आम्ही तुमच्यासोबत युती करू असेही आम्ही त्यांना सांगितले होते. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. यादिवशी आम्ही सूचवलेल्या पर्यायाबाबत भुजबळांनी निर्णय घेतला तर, चांगलं होईल. असे झाल्यास आता नाही पण, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचंतरी चांगलं होईल.
विधानसभेला 100 टक्के EVM ने घोळ केला
जानकरांनी यावेळी ईव्हीएमबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेला नाही पण आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 100 टक्के ईव्हीएमने घोळ केला आहे. तुमचं सरकार आणि तुमचं सरकार एवढं चागलं आहे तर, मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. त्यात जर आमचा पराभव झाला तर आम्ही मान्य करू. विधानसभेला तिसऱ्या पक्षाची सगळी मतं भाजपकडे वळवली असा माझा दावा असल्याचेही जानकर म्हणाले.
भुजबळांना भाजपात घेतल्या वाद होतील
एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो. त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हे वाद टाळण्यासाठी तुर्तास तरी भुजबळांना भाजपमध्ये तुर्तास तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.