Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे.
बीड कारागृहात हिंडकर अन् अक्षय आठवले याच्या जीवितास धोक असून माधव गीते कराड गॅंगला जड जातोय. त्यामुळे महादेव गीतेला तिथून हलविण्यात आलंय. या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. कट्टर गुन्हेगारांना का हलविण्यात आलं नाही, असा सवाल महादेव गीतेच्या पत्नीने केलाय. हा आमच्यावर अन्याय आहे. वाल्मिक कराडच्या आका बोकाचं प्रशासनावर दबाव आहे. त्यामुळे वाल्मिकची सोय प्रशासनाला करण्यात येणार नाही. याला वाचा फोडणारा केवळ महादेव गीतेच होते. प्रशासनाचा जावई असलेल्या वाल्मिक कराडला सुविधा देता येत नसल्यामुळं महादेव गीतेला हलविण्यात आलंय, असा आरोप महादेव गीतेच्या पत्नीने (Meera Geete) केलाय.
औरंगजेबाचे थडगे काढलेच पाहिजे… अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप कडाडले
एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी कशा झाल्या हा माझा सवाल आहे? बीड कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीते यांनी म्हटलंय की, मारहाण झाली असेल, तर त्याचे सीसीटीव्ही पुरावे समोर आणा. सीसीटीव्हीमध्ये कोणी कोणाला मारलं, ते पहा. वाल्मीक कराड अन् सुदर्शन घुलेला मारहाण झाली नसल्याचं स्वतः कारागृह अधीक्षक म्हणत आहेत.
दहा लोक येऊन महादेव गीते यांना मारतात. ही गँग सगळी वाल्मीक कराडची आहे. आमच्या चार जणांची टोळी होते का? या चौघांनी कराड यांना मारहाण केली असेल तर दाखवून द्या. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर माझ्या पतीला साध्या रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं नाही, असा आरोप महादेव गीते यांच्या पत्नी मीरा गीते यांनी केलाय. माझ्या पतीला जेवढ्या झटपट हर्सुल कारागृहात पाठवलं, तेवढंच झटपट पुरावे द्या. बीड जेलमधून हर्सुल कारागृहामध्ये नेत असताना माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं, त्यांनी अक्षय अडसूळचं नाव घेतलं. आमच्याकडून जिवाला धोका होता, तर कराडला दुसऱ्या रूग्णालयात का हलविण्यात आलं नाही, असा देखील सवाल महादेव गितेच्या पत्नीने केलाय.