बीडमध्ये पुन्हा गॅंगवॉर! जेलमधील कराडच्या मारहाणीनंतर बबन गित्तेची फेसबुक पोस्ट म्हणाला ‘अंदर मारना…’

Baban Gitte’s Facebook post After beating Walmik Karad in jail : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा विविध हत्याकांडांनी चर्चेत आला आहे. त्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांडाने ते संपुर्ण राज्य हादरलं आहे. त्यानंतर शिक्षकाची आत्महत्या, महादेव मुंडे हत्या, नुकतीच झालेली संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित महिलेची देखील हत्या झाली आहे. त्यात आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला जेलमध्येच बबन गित्ते यांच्या टोळीतील एकाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बबन गित्तेने फेसबुक पोस्ट करत इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीडमध्ये टोळी युद्ध सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे बबन गित्तेची फेसबुक पोस्ट?
बीड कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड आणि सुर्शन घुलेला मारणार झाल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. (Walmik Karad) महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जातय. मात्र, त्याबाबत कारागृह प्रशासनाकडून काही माहिती समोर आली नाही. मात्र, यावर आता या गॅंगचा म्होरक्या असेलला बन गित्तेने फेसबुक पोस्ट करत इशारा दिला आहे. तो म्हणाला की, ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असं म्हणत एक प्रकारे कराडला गित्तेने हा इशारा दिला आहे का? असा तर्क लावला जात आहे.
वाल्मिक कराड आणि बबन गित्तेचं टोळी युद्ध नेमकं काय?
वाल्मिक कराड. कपाळावर चंदणाचा गंध. पायात चप्पल नाही. कायम हातात दोन मोबाईल. तर दुसरीकडं नाव येत ते बबन गिते. दाढी वाढलेली. कपाळावर चंदन अन् कुंकवाचा गंध. कराड चप्पल घालत नाही आणि गिते दाढी करत नाही. या गोष्टींचं ‘राज’ काय विचारलं तर स्थानिक लोक सांगतात यांनी दोघांनी शपथ घेतली आहे ती एकमेकांना संपवायची. त्यामुळेच एकजण चप्पल घालत नाही तर दुसरा दाढी करत नाही.
रसिक ग्रुपला सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचे अधिक बळ मिळो; प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन
बापू आंधळेंच्या हत्येत बबन गिते यांचं नाव घेतलं जातय. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच नाव घेतलं जातय. त्यामुळे सध्या हे दोन्ही नावं महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. परंतु, मागं वळून पाहिलं तर हे दोघही स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीतले. बबन गिते हा गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून काम करत होता. गोपीनाथ मुंडे बाहेर सर्वत्र फिरत असले तरी स्थानिकच सगळ काम बबन गिते पाहत असायचा. मात्र, पुढच्या काळात बबन गिते आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद झाले.
धनंजय मुंडे यांनाही वाटत होत बबन गिते आपल्याकडं असला पाहिजे. त्याच दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याशी गितेचे मतभेद झाले असल्याने हा योग जुळून आणि गिते राष्ट्रवादीत सामिल झाला. मात्र, काही दिवसांतच पंचायत समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि गिते यांच्यात भांडण झालं. त्यानंतर बबन गिते काही काळ राजकारणापासून दूर राहिला. पुढे, राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. मग बबन गिते याने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, जून 2024 मध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्या प्रकरणात बबन गितेवर आरोप झाले. गिते आणखीही फरार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘त्या’ महिलेची हत्या ? अंजली दमानियांना संशय
दुसरा विषय येतो तो वाल्मिक कराड. कॉलेज शिक्षणासाठी परळीत आला होता. भगवानबाबा गणेश मंडळ स्थापन केलं. त्याच्या माध्यमातून तो गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात गेला. त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास मिळवला. परळीत चांगलाच जम बसवला. त्याच काळात तो गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित आण्णा मुंडे यांच्याही संपर्कात आला. ओघानेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचेही चांगलेच सुत जुळले. 2001 मध्ये वाल्मिक कराड परळी नगर परिषदेमध्ये नगरसेवक झाला. पुढे याच निवडणुकांवरून गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध तानले गेले. नगरपरिषदेत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना मात दिली होती.
पुढे धनंजय मुंडे यांच राजकीय वजन वाढत गेल. तस वाल्मिक कराडचंही परळीत वजन वाढत होत. मात्र, बबन गिते आणि कराडच का खटकलं? तर 2019 ला गितेने धनंजय मुंडेंच काम केलं. मुंडे पहिल्यांदाच विधानसभेचे आमदारही झाले. पुढे मंत्रीही झाले. याच काळात गितेने पंचायत समितीची निवडणूक लढवली. यामध्ये बबन गितेची पत्नी उर्मिला गिते पंचायत समितीत निवडणूक आल्या. परंतु, काही काळातच गिते आणि धनंजय मुंडे गटामध्ये खटके उडाले. नाराज गटाने गितेच्या बायकोविरोधात अविश्वास ठराव आणला. तो पारित झाला. त्याच काळात एका प्रकरणात गितेला तुरुंगातही जाव लागलं होतं. पुढे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमुळेच आपल्या बायकोच पद गेल, आपल्यालाही तुरुंगात जाव लागलं हा राग गितेच्या मनात होता.
डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार
जेव्हा गिते तुरुंगातून बाहेर आला तेव्हा गितेने निश्चय केला की, धनंज मुंडेच राजकारण संपवणार, वाल्मिक कराडला संपवणार त्याच कारणास्तव गिते दाढी करत नाही असंही बोलल जात. तर वाल्मिक कराडने का चप्पल सोडली असा प्रश्न उपस्थित होता. त्यावर कराडने सांगितल माझा मुलगा स्पर्धा परिक्षेची तयारी करतो. आम्ही तिरुपती बालाजीच्या दारात असताना आम्हाला मुलाचा फोन आला की, माझं सलेक्शन थोडक्यात हुकलं. त्यावर मी ठरवल की आता मुलाचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. यामध्ये गितेचा आणि याचा काही संबंध नाही. मात्र, स्थानिकचे पत्रकार काही नागरिक सांगत असतात की या दोघांचं स्थानिक निवडणुका ते राज्य पातळीवरील निवडणुकांत चांगलच लागून असतं. परळी विधानसभेला धनंजय मुंडेंना गिते आव्हान देईल अशी चर्चा होती. मात्र, त्या अगोदरच आंधळे नावाच्या सरपंचाचा गोळ्या घालून खून झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून गिते बाहेर पडला. तर धनंजय मुंडे लाखाच्या फरकाने निवडून आले. त्यावेळी गितेवर कराड भारी पडल्याची चर्चा झाली. आता पुन्हा एकदा हा विषय समोर आल्याने पुढचा नवा अंक कुठला असा प्रश्न पडतो.