संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे संपवायला सुरूवात झालीय; कळंबमधील ‘त्या’ महिलेच्या हत्येवर धसांची प्रतिक्रिया

Suresh Dhas on Murder of Kalamb Woman Related Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अनैतिक संबंधातून खून झाल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी एक महिला तयार ठेवली होती, असा दावा केला जात होता. आता याच महिलेचा मृतदेह सापडला असल्याने राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. त्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुरावे संपवायला सुरूवात झाली का? मात्र हे जरी मोठं दिव्य असलं तरी ही केस आम्हाला शेवटरपर्यंत लढायची आहे. हे सर्व आरोपी फाशीवर जातील तेव्हा आम्हला सर्वांना आनंद होईल. अशी प्रतिक्रीया सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणासंबंधित महिलेच्या हत्येवर दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या ? अंजली दमानियांना संशय
दरम्यान यावेळी वाल्मीक कराडला जेलमध्ये झालेल्या मारहाणीवर देखील धसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जेलमध्ये जर मारामाऱ्या होत असतील तर बाहेर मर्डर करून थकलेले जेलमध्ये मर्डर करणार नाही कशावरून असा सवाल यावेळी धस यांनी केला आहे. त्यामुळे जेल प्रशासनाने या दोन वाद असलेल्या टोळ्यांना एकमेकांपासून दूर ठेवावे. कारण त्यांचा वाद हा जेलमधील फोनवरून झाला आहे. तेथे फोन देखील असल्याची माहिती मला जेलरनेच दिली असं देखील यावेळी धस म्हणाले.
दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh) दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. संतोष देशुमख यांची हत्या केल्यानंतर हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी एक महिला तयार ठेवली होती, असा दावा केला जात होता. परंतु संबंधित महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरातच आढळून आलेला आहे. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali Damania) यांनी एक्स पोस्टमध्ये केलाय. बीड पोलिसांच्या म्हणणानुसार महिलेचा घरात मृतदेह आढळलेला आहे. परंतु हा मृतदेह त्या महिलेचा नाही, असे पोलिसांची म्हणणे आहे.