Download App

पोलिसांसमोरच सत्ताधाऱ्यांचे गँगवॉर, फडणवीसांनी राजीनामा… , गोळीबार प्रकरणी महादेव जानकर आक्रमक

Mahadev Jankar on Ulhasnagar Firing Case : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये (Ulhasnagar police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागले आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, हे कृत्य योग्य नाही. गोळीबार झालेल्या प्रकरणावरती महादेव जानकर म्हणाले की हे योग्य नाही, सत्ता कोणाचीही असो आमदार खासदारांना काही प्रोटोकॉल असतात. मात्र त्यांनी ते पाळावेत या घटनेचा मी समर्थन करणार नाही. प्रजा हीच राजा आहे, तेच आम्हाला लोकप्रतिनिधी बनवतात कोणत्याही आमदार खासदार तसेच मंत्र्यांनी असे आघोरी कृत्य करू नये, असे यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले आहेत.

गृहमंत्र्यांचा राजीनामा…ही केवळ स्टाईल झालीय: दरम्यान या गोळीबार प्रकरणानंतर आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागले आहेत. तसेच राजकीय वर्तुळातून देखील याचा निषेध केला जात असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, कोणाचा राजीनामा मागणं हे आता केवळ एक स्टाईल झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी जानकरांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘कायदा हातात घेणा-यांचा…’

पंकजा मुंडेंना कोणी संपवू शकत नाही…जानकर अस का म्हणाले? भारतीय जनता पक्षामधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावललं जात असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे त्यातच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर या चर्चेंना उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक काढलं जात असल्याचा आरोपही होत आहे यावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, पंकजा मुंडे या माझ्या भगिनी आहे. तसेच पंकजा ताई या मास लीडर आहेत त्यांना कोणीही संपू शकत नाही त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत त्यामुळे त्यांना संघर्ष हा काहो त्यांच्यासाठी नवीन नाही त्या खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे त्यांना संपवण्याचा विषय येत नाही अस यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले.

follow us