‘मविआ’ भक्कम, आधी ‘गोळीबारा’च्या तणावाकडे लक्ष द्या’; काँग्रेस नेत्याने सत्ताधाऱ्यांना फटकारलं

‘मविआ’ भक्कम, आधी ‘गोळीबारा’च्या तणावाकडे लक्ष द्या’; काँग्रेस नेत्याने सत्ताधाऱ्यांना फटकारलं

Nana Patole on Ganpat Gaikwad Firing : महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. तरीदेखील आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firirng) यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अध्यक्षांवर पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तर तिथे काय तणाव आहे तिकडे आधी लक्ष घाला ना, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

नाना पटोले आज पुण्यात आहेत.  यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबाराचा उल्लेख करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडी राज्यातील सर्व 48 जागा मिळून लढणार असल्याचे सूतोवाचही केले.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘कायदा हातात घेणा-यांचा…’

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर कालच्या बैठकीनंतर म्हणाले होते, की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे परंतु, काँग्रेसबरोबर अजून आमची चर्चा सुरू आहे. यावर उत्तर देताना पटोले यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत नाहीत तर महाविकास आघाडीत आहेत. राज्यात ही आघाडी आगामी काळात मजबुतीने वाटचाल करणार आहे. भाजपविरोधात जितके पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची मानसिकता आहे. ते काम आम्ही करत आहोत.

भाजपाचे आयटी, ईडी आणि सीबीआय असे तीन कार्यकर्ते आता जागे झाले आहेत. कशा पद्धतीने दबावतंत्र सुरू आहे हे आपण सगळे पाहतच आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (हेमंत सोरेन) आत टाकण्याचा जो प्रयत्न झाला तो आपल्या सगळ्यांनीच पाहिला आहे. या हुकूमशाहीच्या वातावरणात काही लोक दबावात येत आहेत. हे नाकारता येत नाही. परंतु वास्तविकता वेगळी असते ती मीडियाच्या माध्यमातून मात्र वेगळंच दाखवलं जात आहे. मीडियाच्या मालकांनाही या गोष्टीची जाणीव आहे.

नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सांगितला PM मोदींचा प्लॅन ?

मी कालच्या बैठकीला उपस्थित होतो. माझ्यासमोरच प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. इंडिया आघाडीबद्दल (INDIA Alliance) त्यांनी सांगितलं आहे. परंतु, आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. दुसरे म्हणजे महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षांवर पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तर तिथे काय तणाव आहे तिकडे आधी लक्ष घाला ना. महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. सामोपचाराने जागावाटपाचा निर्णय होईल आणि आम्ही मिळून 48 जागा लढू आणि विजय मिळवू अशी आमची भूमिका आहे.

जागावाटप आठ-दहा दिवसांत फायनल 

आमचे मेरिटच्या आधारावर जागावाटपाचे सूत्र आहे. येत्या आठ दहा दिवसांत फायनल होईल. लहान मोठ्याचा प्रश्न नाही. राज्यातील 48 जागा आम्ही मिळून लढणार आहोत. महायुतीसारखा गोळीबार करणार नाही असाही खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube