गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड आहे? राऊतांकडून शिंदे-फडणवीस धारेवर

गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड आहे? राऊतांकडून शिंदे-फडणवीस धारेवर

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘कायदा हातात घेणा-यांचा…’

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांपासून माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे. महाराष्ट्रात जे राज्य आणले आहे. ते झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे. कालचा प्रकार उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे. या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या त्रासातून,मनस्तापातून हा गोळीबार केला असल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे.

Poonam Pandey च्या निधनावर बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; शेवटचं घरी सोडलं तेव्हा मॅडम…

मी या गोळीबाराचे समर्थन करणार नाही. गृहमंत्री त्यांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारच निर्माण होतील. वर्षभर सांगत आलो आहोत की, मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारी टोळ्यांना दुरध्वनी जातात. उद्याच्या निवडणुकांसाठी मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले जात आहे. पुण्यात चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना राजकारणासाठी जामिनावर बाहेर काढण्यात आले. मुंबईमध्ये तेच सुरू आहे. कायद्याचे राज्य नाही तर फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जमीन देण्यासाठी सरकारमधील तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे देईल? असं राऊत म्हणाले.

Box Office: 9 दिवसांत ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 150 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

तर गृहमंत्री फडणवीसांवर बोलताना राऊत म्हणाले की, गृहमंत्री कुठे आहेत? कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. असे बोलतात मग हा न्याय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी आहे का? चर्चा करण्याएवढे प्रकरण साधे आहे का? सर्वसामान्य असते तर आता पर्यंत फासावर लटकवले असते.गृहमंत्री वक्तव्य करतील पण त्यांना आजच्या प्रकरणानंतर उत्तर द्यायला तोंड आहे का? देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळने आता यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस वकील आहेत ज्ञानी आहेत. राम तुमच्या बाजूने आहे. असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत.

तसेच सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय पाठबळ आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय काम करत आहे. महाराष्ट्र एवढा रसातळाला कधीच गेला नव्हता.गोळीबार केलेल्या आमदाराला जामीन देतील. पण राजन साळवी व कुटुंबीयांना जामीन नाही. गोळीबार करणाऱ्यांना जमीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल. अशा शब्दांत राऊतांनी शिंदे फडणवीसांना धारेवर धरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube