Poonam Pandey च्या निधनावर बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; शेवटचं घरी सोडलं तेव्हा मॅडम…

Poonam Pandey च्या निधनावर बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; शेवटचं घरी सोडलं तेव्हा मॅडम…

Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (2 फेब्रुवारीला) समोर आली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली होती. त्यानंतर आता या निधनावर पूनमच्या बॉडीगार्डने (Bodyguard) पूनमच्या आरोग्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

Box Office: 9 दिवसांत ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 150 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

पुनमचा बॉडीगार्ड अमीन खानने सांगितलं की, 29 जानेवारीला त्याने पूनमला शेवटचं घरी सोडलं. त्यावेळी तिने तिची तब्येत ठीक नसल्याचे असं काहीही मला किंवा इतर कोणत्याही स्टाफला ते सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे ती अचानक आजारी कशी पडली? ज्यामुळे तिचा थेट मृत्यू झाला. अशा अनेक संशयास्पद गोष्टी पूनम पांडेच्या मृत्यूनंतर चर्चेला आले आहेत.

गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार

तसेच पूनमच्या बॉडीगार्डने सांगितले की, गेले दहा वर्षांपासून तू पूनम सोबत आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूमुळे त्यालाही देखील मोठा धक्का बसलाय. तसेच त्याने सांगितले की, तिच्या मृत्यूनंतर तिची बहीण आणि तिच्या कुटुंब कोणीही फोन कॉल रिसिव्ह करत नाहीये. तर पूमनच्या टीमने जेव्हा तिच्या निधनाची बातमी दिली. तेव्हा ती तिच्या बहिणीनेच ही बातमी टीमला सांगितली होती. आता मात्र तिची बहिण आणि कुटुंब संपर्क साधत नाहिये.

लोकांना पूनम पांडे हिचा मृत्यू म्हणजे अफवा आहे असं का वाटतंय?

पूनमच्या अधिकृत खात्यातून माहिती दिली जात असतानाही लोक तिच्या मृत्यूवर विश्वास का ठेवत नाहीत? कारण पूनमने यापूर्वी अनेकदा असे पब्लिसिटी स्टंट केले आहेत, जे नंतर खोटे असल्याचे सिद्ध झाले आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे वर्ल्ड कप 2011, पूनमने वचन दिले होते की जर टीम इंडियाने फायनल जिंकली तर ती तिचे कपडे उतरवेल. मात्र, लोकांचे लक्ष वेधण्यासाठीच आपण हे विधान दिल्याचे तिने नंतर स्पष्ट केले होते.

सोशल मीडियावर पूनमच्या मृत्यूच्या दाव्यांमुळे काही लोकांना त्रास झाला, तर बहुतेक लोक याला खोटे म्हणत आहेत. पूनम याआधीही अशा प्रकारची कामे करत असल्याचे तिने अनेकदा स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, बहुतेक रिपोर्ट्स सांगत आहेत की ती आता या जगात नाही. पण पूनमचा इतिहास पाहता यावर विश्वास कोणी देखील विश्वास ठेवण्यास तयार नाहीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube