Shinde-Fadanvis : ‘एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते; म्हणे, फेविकॉल का जोड’, राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
Sanjay Raut on Shinde-Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यानंतर आज शिंदे- फडणवीस एकाच मंचावर दिसले. यावेळी फडणवीसांनी मी नाराज नसूव आमच्यात फेविकॉल का जोड है. असं म्हटलं त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला आहे. ( Sanjay Raut criticize Shinde-Fadanvis On Advertisement issue)
Agriculture Raids : मंत्र्यांचेच पीए छापे मारताहेत, अजित पवारांची सत्तारांवर टीका…
यावेळी संजय राऊत यांनी जाहिरतवादानंतर गुरूवारी प्रथमच एकत्र आलेल्या शिंदे-फडणवीसांवर टीका केली. राऊत म्हणाले की, फडणवीस म्हणतात की शिंदे आणि आमचा फेविकॉल का जोड है. मग फडणवीसांचे प्रवक्ते अनिल बोंडे मुख्यमंत्र्यांची तुलना बेडकाशी केली. हा फेविकॉल का जोड आहे का? तसेच कालच्या कार्यक्रमात तर शिंदे-फडणवीस एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते. त्यामुळे हा जोड नसून पुढच्या 2 महिन्यात न्यायालयचा निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल आणि हे सरकार गेल्याशिवाय राहणार नाही.
Defence Deal : शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून घातक ड्रोन खरेदी…
तसेच यावेळी भाजपकडून संजय राऊतांवर स्वतः च्याच धमकीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. जाहिरातकांडावरच लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या धमकीप्रकरणाकडे बोट दाखवण्यात येत आहे. मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही. तुम्ही माझे पोलिसांबरोबरचे कोणतेही पत्र व्यवहार पाहू शकता. मी आमचं सरकार असताना देखील सुरक्षा मागितलेली नाही. तसेच आता धमकी प्रकरणी काहींना अटक झाली आहे. तो देखील सरकारचाच बनाव असेल. मला त्याबद्दल माहिती नाही. अशी प्रतिक्रिया दिली.
राऊतांचं धमकी प्रकरण नेमकं काय?
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. कारण या प्रकरणात मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे.