Agriculture Raids : मंत्र्यांचेच पीए छापे मारताहेत, अजित पवारांची सत्तारांवर टीका…
राज्यात शेतमालाची साठेबाजी, बोगस बियाण्यांप्रकरणी छापा मारण्यासाठी मंत्र्यांचेच पीए जात असल्याची टीका अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर नाव न घेता केलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, कृषी विभागाच्या कथित पथकाच्या छापेमारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच धारेवर धरलंय.
Horoscope Today 16 June: तुमचं करिअर अन् पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास? जाणून घ्या…
अजित पवार म्हणाले, खतांच्या किमती, साठेबाजी, काळाबाजार प्रकरणी कृषी विभाग छापेमारी करीत असल्याचं सांगत आहे, परंतु प्रत्यक्षात छापेमारीसाठी मंत्र्यांचेच पीए जात असल्याचं दिसतंय. त्यानंतर एकीकडे माझा पीए नसल्याचं मंत्री सांगताहेत, तर दुसरीकडे कागदोपत्रात पीएचं नाव दिसत आहे, यावरुन राज्यात किती भ्रष्टाचार सुरु आहे, हे स्पष्ट होत असल्याचं पवार म्हणाले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरातमध्ये धडक, पाहा फोटो
तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सरकारला सोडलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेले आहेत त्यानूसार बदल्या होत आहेत. शिंदे गटाचे 40 आमदार नाराज होऊ नये म्हणून सरकार त्यांच्या सांगण्यावरुन अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
Marathi Theater Council: नाट्यगृहांना येणार अच्छे दिन; CM शिंदेंनी जाहीर केली एक खिडकी योजना
यावेळी बोलताना त्यांनी तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला याबाबत विचारा तेही हेच सांगणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मी विरोधाला विरोध आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा माणूस नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
दरम्यान, अकोल्यातील एमआयडीसीमध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकामध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळींचा देखील समावेश असल्याचं उघड झालं आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे.
छापेमारीमध्ये अब्दुल सत्तारांचा पीए असल्याचा आरोप होत असतानाच तो माझा पीए नसल्याचा दावा सत्तारांनी केला मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दौऱ्यात त्याचं पीएचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालंय.