बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरातमध्ये धडक, पाहा फोटो

द्वारका जिल्ह्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा भीषण परिणाम दिसून येत आहे. वादळी चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली असून मुसळधार पाऊस पडत आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

समुद्रातून उंच लाटा उसळत आहेत. त्यादृष्टीने 15 टीम वेगवेगळ्या ठिकाणी एअरलिफ्टसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. जखाऊ बंदराजवळ लँडफॉल सुरू झाला असून, तो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
