Nana Patole : जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन कुठेही बिघाडी होणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमधील टीळक भवनला (Tilak Bhavan)पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाइन नंबर जारी
भारतीय जनता पक्षाचा परभव करणे हाच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लक्ष्य आहे. भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
Jan Man Survey : 10 वर्षातील भारताच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल काय वाटते? PM मोदींचा सवाल
त्याउलट महायुतीमध्ये जागा वाटपावरुन तीव्र मतभेद आहेत, त्यांच्यात भयानक तणाव आहे, परंतु भाजप शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा सामोपचारानं सोडवला जाणार असल्याचेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असल्याचे सांगितले आहे, त्यावरुन पत्रकारांनी नाना पटोलेंना सवाल केला की, खरच आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावर पटोलेंनी त्यावर होकार दिला आहे. पटोले म्हणाले की, सुप्रियाताईंनी बरोबर सांगितलेलं आहे की, मेरीटच्या आधारावर आमचं सूत्र ठरलेलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपसा पक्ष 23 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यावर नाना पटोले म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्या विषयावर बोलणं आणि पक्षातील दुसऱ्या नेत्यांनी बोलणं याच्यात फरक आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं सगळे वादाचे विषय बंद झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबद्दल कोणतेही मतभेद नसल्याचे यावेळी पटोले यांनी स्पष्ट केले आहे.