Download App

पडळकर हसले, म्हणाले ‘त्याला नंतर’.. सावंतांच्या टीकेला एका शब्दात उत्तर

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना तमासगीर असे संबोधत जोरदार टीका केली होती. या टीकेला आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले. सावंत यांनी केलेल्या टीकेवर त्यांना प्रश्न विचारला असता पडळकरांनी हसत ‘जाऊ द्या, त्याला नंतर ठोकू’ असे उत्तर दिले.

एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, की महाविकास आघाडीचे सरकार (MVA) असतानाही कामगारांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात पडळकर आघाडीवर होते. आता तर त्यांचेच सरकार असतानाही कमर्चाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, यावर पडळकर का बोलत नाहीत.

वाचा : ‘गोपीचंद पडळकर एक तमासगीर’.. चिडलेल्या सावंतांची पडळकरांवर आगपाखड

दिवाकर रावते परिवहन मंत्री होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात चांगले काम झाले. या काळात त्यांनी विविध योजना सुरू करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. एसटीत महिला कंडक्टर नियुक्त करण्याचे कामही आमच्या सरकारच्या काळात केले, असेही सावंत म्हणाले. दिवाकर रावते व त्यानंतर अनिल परब यांच्यासारखे काम कुणीच केले नाही,असा दावा सावंत यांनी केला.

आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस, अरविंद सावंत संतप्त

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे आंदोलन झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांना पगारात वाढ देण्यात आली होती. तरी देखील भाजप आमदार पडळकर यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. ते एक तमासगीर आहेत, लाज वाटली पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला पडळकर यांनी जास्त महत्व दिले नाही.

 

Tags

follow us