आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस, अरविंद सावंत संतप्त

  • Written By: Published:
Untitled Design 12

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेदिवस वाढत आहेत. ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली.

यावर शिवसेना ठाकरे गट नेते अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू आहे. भ्रष्टाचारी वृत्तीची माणसं उलट सज्जन माणसाला भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन ठाकरे गटाला ब्लॅकमेलिंगचा हा सगळं प्रकार आहे.

निवडणूका समोर येतील तसं ठाकरे गटाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होणार असून नितीन देशमुख यांच्याकडे चौकशीत काही कागदपत्रे सापडणार नाहीत. या सर्व आरोपांमुळे आता भाजपा व शिंदे गटाची घृणा यालाला लागली. अशा शब्दात अरविंद सावंत यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे.

गुवाहाटीला न जाता सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. त्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देशमुखांना देण्यात आले आहेत.

Tags

follow us