Download App

चोरडियांच्याच घरी शरद पवारांची भेट का घेतली? अजितदादांनी सत्य सांगूनच टाकलं

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता खुद्द अजित पवार यांनीच या भेटीबाबत माहिती दिली आहे.

लपून गेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता

अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय ध्वजारोहणानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुण्यातील भेटीबाबत प्रश्न विचारला. या बैठकीला लपून गेल्याबाबतही चर्चा होती. हाच प्रश्न एका पत्रकाराने अजित पवार यांना विचारला. त्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. मी लपून गेलेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला लपून जाण्याच काय कारण?. तू कुठं बघितलं मला लपून गेलेलं? असा सवाल त्यांनी केला. मी उद्या तुमच्या घरी आलो. तुमच्या घरातून कधी बाहेर पडायचं हा माझा अधिकार आहे.

Ajit Pawar : अजितदादांच्या उपस्थितीतच मराठा आरक्षणाच्या बैठकीत गोंधळ

मी बैठकीला गेलो माल मान्य आहे. परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणताय ती गाडी माझी नव्हतीच. वेडाच आहे, असे ते प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला उद्देशून म्हणाले. चोरडिया आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. चोरडियांचे वडील हे पवार साहेबांचे वर्गमित्र होते. पवार साहेब तिकडून व्हिएसआयचा कार्यक्रम आटोपून येणार होते. माझा कार्यक्रम पुण्यातील चांदणी चौकात होता. त्यावेळेस चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं होतं. जयंत पाटील त्यांच्याबरोबर होते. कारण, ते सुद्धा व्हिएसआय कमिटीचे सदस्य आहेत.

म्हणून मी चांदणी चौकातल्या कार्यक्रमाला गेलो

परंतु, नितीन गडकरी यांनी मला एक महिनाआधीच सांगितलं होतं. पुणेकरांच्या तसेच सातारा, मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी हा पूल महत्वाचा आहे. मला सुद्धा हे माहिती होतं कारण मी सुद्धा पुण्याचा पालकमंत्री होतो. या पुलासाठी खूप अडचणी आल्या. पण, आम्ही आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी त्या अडचणी सोडवल्या.

मलाही त्या मिटींगला हजर राहायचे होते. दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष तर पवार साहेब अध्यक्ष आहेत व्हिएसआयचे. मी तिथंच सांगितलं होतं की येऊ शकत नाही मी तिकडच्या कार्यक्रमाला जातो. जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलावले तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाही.

भाजी विक्रेत्याची इच्छा, राहुल गांधींनी थेट जेवायलाच बोलावलं; लंच डिप्लोमसीचा ‘असा’ही किस्सा!

Tags

follow us