Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे. जर शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाहीच तर पुढे काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर पत्रकारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संवाद साधला.
पत्रकारांनी त्यांना विचारले की शरद पवारांनी तुम्हाला राष्ट्रवादीचं अध्यक्ष केलं तर होणार का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हणणे मांडले.
अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले
ते म्हणाले, अरे बाबा अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरी मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. मी त्या पदावर आजिबात काम करू शकत नाही. तसा विचार करण्याचााही प्रश्न निर्माण होत नाही.
शरद पवार काय म्हणाले ?
दरम्यान,आज शरद पवार यांनी आज वाय.बी. सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, जर मी तुमच्या सर्वांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ दिला नसता. मात्र येत्या एक ते दोन दिवसांत मी अंतिम निर्णय घेईल जेणेकरून कार्यकर्त्यांना असे आंदोलन करावे लागणार नाही.
निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ
मी हा जो निर्णय घेतला आहे त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत निर्णय सांगू. दोन दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांना समजावताना शरद पवारांनी आपली भूमिका सांगितली.
दरम्यान, शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यापासून राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यातच राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी देखील शरद पवार यांची मनधरणी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांनी थेट आंदोलनाला बसले आहे. पवार यांनी निर्णय मागे घ्यावा असे आवाहन कार्यकर्त्यांनी पवारांना केले आहे.