राज ठाकरेंना भाजपाची ऑफर; अजितदादा म्हणाले, मला असलं काही…

Ajit Pawar replies Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचा दावा केला होता. ऑफर असली तरी भाजप अजित पवारांचं (Ajit Pawar) काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असे राज ठाकरे म्हणाले […]

उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही पूर आला; पुण्याच्या पुरावरून राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

raj thackeray ajit pawar

Ajit Pawar replies Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचा दावा केला होता. ऑफर असली तरी भाजप अजित पवारांचं (Ajit Pawar) काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार आज (15 ऑगस्ट) कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय ध्वजारोहणानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर अजितदादांनी थोड्या संतापाच्या स्वरात प्रतिक्रिया दिली.

चोरडियांच्याच घरी शरद पवारांची भेट का घेतली? अजितदादांनी सत्य सांगूनच टाकलं

हे राज ठाकरे बोलले आहेत, मी सांगितलेलं नाही. राज ठाकरेंना भाजपने ऑफर दिली असेल पण, त्याचा माझ्याबरोबर काहीच संबंध नाही. मी त्यावर बोलणारही नाही. भाजपने ज्याला ऑफर दिली तो त्यांचा आणि भाजपाचा विषय आहे. मी त्यात कशाला नाक खुपसू. त्यामुळे मला असलं काही तरी विचारत जाऊ नका. माझ्याशी संबंधित प्रश्न किंवा राज्य सरकारशी संबंधित प्रश्न जरूर विचारा, असे अजित पवार म्हणाले.

यानंतर अजित पवार यांनी नवाब मलिकांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. दीड वर्षांनंतर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्याशी काही चर्चा झाली का असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, माझी आणि नवाब मलिकांची भेट झालेली नाही. मी कालच कोल्हापुरला आलोय. फोनवर अशी चर्चा होत नाही. अटक झालेल्या व्यक्तीशी अशा प्रकारे फोनवर बोलता येत नाही. सध्या त्यांना वैद्यकिय कारणांमुळे जामीन मिळाला आहे. त्यातून ते बाहेर आल्यानंतर भेटता येईल.

MHADA Lottery 2023: मराठवाड्यातील भाजप आमदाराला ‘लॉटरी’, तब्बल साडेसात कोटींचे मुंबईत घर

मी बैठकीला लपून गेलो नाही

पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. चोरडियांचे वडील हे पवार साहेबांचे वर्गमित्र होते. पवार साहेब तिकडून व्हिएसआयचा कार्यक्रम आटोपून येणार होते. माझा कार्यक्रम पुण्यातील चांदणी चौकात होता. त्यावेळेस चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं होतं.

जयंत पाटील त्यांच्याबरोबर होते. कारण, ते सुद्धा व्हिएसआय कमिटीचे सदस्य आहेत. जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलावले तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाही.

Exit mobile version