MHADA Lottery 2023: मराठवाड्यातील भाजप आमदाराला ‘लॉटरी’, तब्बल साडेसात कोटींचे मुंबईत घर

  • Written By: Published:
MHADA Lottery 2023: मराठवाड्यातील भाजप आमदाराला ‘लॉटरी’, तब्बल साडेसात कोटींचे मुंबईत घर

मुंबईः मुंबईत आता घर घेणे अशक्य झालेले आहे. घरांच्या किंमती कोटींच्या घरात गेल्या आहेत. म्हाडाच्या घराच्या किंमती कोट्यवधी रुपयात गेल्या आहेत. मुंबईतील म्हाडाच्या एका प्रकल्पातील घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाखांच्या घरात होती. हे घर आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना मंजूर झाले आहे. कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनीही या घरासाठी अर्ज केला होता. परंतु कुचे यांचा नंबर लागल्याने त्यांना हे घर मिळणार आहे.

Box Office New Record: १०० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये सनी पाजीच्या ‘गदर२’ची तीन दिवसांची कमाई तब्बल…

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील म्हाडाच्या उच्चभ्रू इमारतीमध्ये हे घर आहे. सोमवारी या घरांसाठी सोडत काढण्यात आली. या इमारतीमध्ये 4 हजार 82 प्लॅट आहेत. 24 लाखांपासून ते 7 कोटी 57 लाख रुपये घरांची किंमत आहे.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांचे विक्रम ; यंदा किती मिनिटे भाषण?

अल्प, मध्य व उच्च उत्पन्न गटांसाठी घराची सोडत झाली. 120 घरे उच्च उत्पन्न गटासाठी राखीव होती. तर 130 घरे मध्य उत्पन्न गटांसाठी राखीव होती. तर 2 हजार 700 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी, तर एक हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी होती.

आमदार कुचे व केंद्रीय मंत्री भागवत कराड या दोघांनी सुमारे 7 कोटी 58 लाखांच्या घरासाठी अर्ज केला होता. पंधराशे चौरस फुटांचे हे घर आहे. कुचे यांना हे घर मंजूर झाले आहे. आमदार-खासदार यांच्यासाठी हे एकच घर राखीव होते.


कुचे हे घर कसे खरेदी करणार ?

माझे इतर कुठेही घर नाही. त्यामुळे मुंबईतील घरासाठी अर्ज केला होता. हे घर घेण्यासाठी मी बँककडे गृहकर्जासाठी अर्ज करणार असल्याचे आमदार कुचे यांनी मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube