”दादांच्या विमान अपघाताचा रिपोर्ट जानेवारीपूर्वी; पायलटच्या खात्यात संशयास्पद व्यवहार नाहीत”

Devendra Fadnavis CM फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

CM Fadnavis On Ajit Pawar Plane Crash

CM Fadnavis On Ajit Pawar Plane Crash

CM Fadnavis On Ajit Pawar Plane Crash : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा सध्या सीआयडी (CID) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) अशा दोन स्वतंत्र यंत्रणांकडून समांतर तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, AAIBचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी सीबीआयला या तपासात हस्तक्षेप करता येत नाही, अशी भूमिका केंद्रीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. ते अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर देत होते.

माझ्या भाषणाने सुपारी बाजांना मिर्ची लागली; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता राज ठाकेंवर बोचरी टीका

सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात विविध बाबींची पडताळणी करण्यात आली आहे. विशेषतः पायलट सुमित कपूर यांच्या बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि गुंतवणुकीची तपासणी करण्यात आली. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही आणि इतर फुटेजचेही विश्लेषण करण्यात आले. मात्र, या तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे AAIBचा तपास. अपघातग्रस्त विमानातील उपकरणांमधून आवश्यक तांत्रिक माहिती (डेटा) यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आली असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. अंतिम अहवालाच्या वेळापत्रकाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. त्यानुसार जानेवारीपूर्वी AAIBचा अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

“रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या तपासाला तीन ते चार वर्षे लागू शकतात, असे म्हटले होते. ते काही प्रमाणात खरे असले, तरी या प्रकरणात अमेरिकेतील तज्ज्ञ संस्थेचीही मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीपूर्वी अंतिम अहवाल येईल, अशी अपेक्षा आहे. सरकारचे या संपूर्ण प्रकरणावर सातत्याने लक्ष आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version