हिरामण खोसकर विरोधकांना निवडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले

आगितून निघालो आणि फुपाट्यात पडलो असं कधीच वाटून देणार नाही असं म्हणत अजित पवारंनी हिरामण खोसकर यांना शब्द यावेळी दिला.

हिरामण खोसकर विरोधकांना निडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले

हिरामण खोसकर विरोधकांना निडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले

Ajit Pawar Trimbakeshwar Sabha : अजित पवार मी सर्वांना सांगतो आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे माणसं आहोत. त्यामुळे आम्ही जातीभेत कधी करत नाही. सर्वधर्म समभाव समोर ठेऊन आम्ही काम करतो. परंतु, काही वाचाळवीर काही वक्तव्य करून जातात. हाताचे पाच बोट सारखे नाहीत. त्यामुळे असं काही घडलं तर आम्ही लगेच समज देत असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. ते त्र्यंबकेश्वर येथे जन सन्मान सभेत बोलत होते.

विधानसभेच्या रिंगणातील अजित पवारांचे शिलेदार ठरले; संभाव्य यादी आली समोर, कोण कुठं लढणार?

मी काँग्रेस विचारांतूनच बाहेर आलो आहोत. मी पहिला खासदार काँग्रेसचाचं होतो. पुढे आमदारही दोनवेळा झालो ते काँग्रेसमधूनच झालो. परंतु, काही कारणांनी ही भावंड वेगळी झाली. त्यामुळे मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आगितून निघालो आणि फुपाट्यात पडलो असं कधीच वाटून देणार नाही असं म्हणत अजित पवारंनी हिरामण खोसकर यांना शब्द यावेळी दिला. तसंच, कधीही कंटाळा न करणारा कार्यकर्ता म्हणून हिरामणला ओळखल जातं असी स्तुतीही अजित पवार यांनी केली आहे.

हिरामण खोसकर हा सुमारे चार लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री आहे. पूर्ण राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कुठल्या समुहाचा नाही. त्यामुळे माझ्या आमदारांसोबत हिरामण याचंही त्यामध्ये नावं असायचं असंही अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर याच सरकारच्या काळात नाही तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही मी हिरामण याला मदत केलेली आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान

हे तुमचे सावत्र भाऊ आहेत. आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत. आम्ही पुन्हा आलो तर ही लाडकी बहीण योजना कायम राहील अन्यथा हे सावत्र भाऊ ती बंद करतील. त्यामुळे तुम्ही ठरवा कोणता भाऊ आणायचा असं म्हणत अजित पवार यांनी यावेळी आपल्याला मतदान करावं असं अप्रत्यक्ष आवाहन केलं. तसंच, विरोधक कोर्टात गेले. परंतु, कोर्टाने त्यांचं काही ऐकलं नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मी १० वेळेस अर्थमंत्री झालो आहे. त्यामुळे मला मोठा अनुभव आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Exit mobile version