Diamond-pearl son seized in Ahmednagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वार वाहायला लागल्यापासून राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. (Diamond) या पार्श्वभूमीवर अहमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अहमदनगर-पुणे मार्गावर
मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी चालले होते. अहमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची चौकशी केली. याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Diwali Festival 2024: फटाक्यांच्या आतषबाजीचा कडेलोट; फक्त पुणे शरहात ३१ ठिकाणी आगीच्या घटना
या कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटं तर एकूण 53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेतले आहेत. तपासणीत 14 अधिकृत पावत्याही आढळून आल्या. तर वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर या संबंधीचा 15 पानांचा पंचनामा केला आहे.
चार जण ताब्यात
कारवाईतील सोन्या-चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा करण्यात आले आहे. बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीये. या प्रकरणी बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गोरख भिंगारदिवे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई एकच खळबळ उडाली आहे.